पेठवडगाव: हातकणंगले मतदारसंघाचे आमदार राजू आवळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तब्येत चांगली असल्याची माहिती रविवारी त्यांनी सोशल मीडियावरून दिली. गेल्या चार- पाच दिवसात संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी मतदारसंघात गावोगावी भेटी देऊन कोरोनाविरोधी लढ्यात अग्रक्रमाने काम केले होते. सर्वात प्रथम कोरोना प्रतिबंधात्मक करण्यासाठी ५० लाखांचा निधी दिला होता. दुसऱ्या लाटेत देखील ते दररोज कार्यरत होते. गोकुळ निवडणूक प्रचारात ही सहभागी झाले होते. त्याचबरोबर हातकणंगले, पेठवडगाव आणि सूतगिरणी कार्यालयात ते दररोज नागरिक व कार्यकर्ते यांना भेटत असत. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना कोराेनाने गाठले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दहा दिवस होमक्वारंटाईन होत उपचार घेत असून लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन असा विश्वास आमदार आवळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी विलिनीकरणात राहत टेस्ट करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
०९ राजू आवळे