शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

कोल्हापूर: किणी टोल नाक्यावर मनसे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वातावरण तणावपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 5:13 PM

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर सुरू असलेली टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आज तिसऱ्यांदा आंदोलन करण्यात येणार होते.

किणी : मुदत संपून सुद्धा सुरु असलेली टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मोडून काढले. आंदोलकांची धरपकड केल्याने टोलनाका परिसरात तणावपूर्ण वातावरण बनले होते.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर सुरू असलेली टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आज तिसऱ्यांदा आंदोलन करण्यात येणार होते. दुपारी दीड वाजण्याचा सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली टोल नाक्यावर दोन लक्झरी बसने पुरुष व महिला कार्यकर्ते दाखल झाले.मनसेचा विजय असो, बंद करा बंद करा टोल वसुली बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शासनाच्या व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकरांचा निषेध नोंदविण्यासाठी तिरडी मोर्चासाठी आणलेली तिरडी व मडके पोलिसांनी काढून घेतले. तर टोलनाक्यापासून काही अंतरावरच जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना पोलिसांनी बळाचा वापर करत उचलुन नेऊन पोलीस व्हॅनमध्ये घातले. महिला, कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पेठवडगाव पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले. अचानक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.परवानगी घेऊन सुद्धा पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढले असून इथून पुढे लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले. आंदोलनामध्ये प्रविण माने, नागेश चौगुले, नयन गायकवाड, फिरोज मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांचे नेतृत्वाखाली जलद कृती दलाच्या तीन तुकड्यासह जयसिंगपूर, हातकणंगले, पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे टोलनाक्यावर पोलीस छावणीची  प्राप्त झाली होते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाकाMNSमनसे