शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मोबाईल व्यावसायिकास ७० हजारांचा आॅनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:53 AM

कोल्हापूर : बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असून, आपले डेबिट कार्ड रजिस्टर करायचे आहे, असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर ...

ठळक मुद्देमोबाईल व्यावसायिकास ७० हजारांचा आॅनलाईन गंडा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असून, आपले डेबिट कार्ड रजिस्टर करायचे आहे, असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेत मोबाईल व्यावसायिकास हॅकर्सने सुमारे ७० हजार रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला.अधिक माहिती अशी, शाहिद महंमद ढोले (वय २८, रा. दुधाळी पॅव्हेलियनजवळ, कोल्हापूर) यांची मोबाईल शॉपी आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी ढोले यांच्या मोबाईलवर फोन आला. मी बजाज फायनान्स मधून बोलत असून, आपले डेबिट कार्ड रजिस्टर करायचे आहे, असे सांगून त्यांची बँक खात्याची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर ढोले यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेतला.

काही वेळातच त्यांच्या कावळा नाका येथील एस बँकेच्या खात्यातून ७० हजार रुपये परस्पर काढल्याचा मॅसेज आला. ढोले यांनी आलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद असल्याचे दिसून आले.

हॅकर्सनी आपल्या बँक खात्यावरून परस्पर आॅनलाईन पैसे काढल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २३) फिर्याद दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर