शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कारागृहात मोबाईल, गांजा टाकणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 10:38 AM

Jail Crimenews kolhpaur- कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरून बेकायदेशीरपणे मोबाईल व गांजा फेकणाऱ्या गन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. चौघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी ऋषिकेश सदाशिव पाटील (रा. कोदवडे, ता. राधानगरी) या पैलवानाला ताब्यात घेतले.

ठळक मुद्देचौघांची नावे निष्पन्न : वाहन जप्त; दोन पैलवानांचा समावेशसांगलीच्या दोघांसह, जयसिंगपूर, कोदवडेतील संशयितांचा सहभाग

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरून बेकायदेशीरपणे मोबाईल व गांजा फेकणाऱ्या गन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. चौघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी ऋषिकेश सदाशिव पाटील (रा. कोदवडे, ता. राधानगरी) या पैलवानाला ताब्यात घेतले.

गुन्ह्यातील चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. सीसीटीव्हीच्या मदतीने हा छडा लागला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नावे निष्पन्न झालेले संशयित असे : भिष्म्या ऊर्फ भीम्या सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), राजेंद्र ऊर्फ दाद्या धुमाळ (रा. रेल्वे स्टेशननजीक, जयसिंगपूर), ऋषिकेश सदाशिव पाटील (२५, रा. कोदवडे, ता. राधानगरी, सध्या रा. गंगावेश, कोल्हापूर), जयपाल किसन वाघमोडे (रा. वडिये, ता. कडेगाव, जि. सांगली, सध्या रा. गंगावेश, कोल्हापूर).अधीक्षक बलकवडे म्हणाले, दि. २२ डिसेंबर २०२० रात्री सव्वा वाजता भिष्म्या चव्हाण व राजेंद्र धुमाळ हे दोघे चारचाकी वाहनातून गंगावेशमध्ये आले. तेथील एका तालमीतील ऋषिकेश पाटील व जयपाल वाघमोडे यांना घेऊन कळंबा कारागृहानजीक गेले.

तेथे राजेंद्र धुमाळ याने दहा मोबाईल, गांजा, मोबाईल चार्जर, पेनड्राईव्ह असे तीन गठ्ठे करून कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरुन आत फेकले. चौकशीत पोलिसांनी मंगळवारी गंगावेश येथून ऋषिकेश पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर हा उलगडा झाला. गुन्ह्यात वापरलेले वाहनही पोलिसंनी जप्त केले.सीसी टीव्हीने काढला वाहनाचा मागकारागृहात मोबाईलसह गठ्ठे टाकलेल्या गाडीचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. शहरातील सेफ सिटीच्या सीसी कॅमेऱ्याचे फुटेज कॅमेऱ्यात गाडीचा नंबर अस्पष्ट दिसल्याने खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घ्यावा लागला. संशयितांची गाडी कोठून कोठे गेली, हे निष्पन्न झाले.दोन पैलवानांचा सहभागकोल्हापुरात पैलवानकी करण्यासाठी राज्यासह परराज्यातूनही येतात. पण काही मोजकेच असे पैलवान गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले आहेत. त्यातील ऋषिकेश पाटील व जयपाल वाघमोडे हे दोघे पैलवान गंगावेश परिसरातील तालमीत राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.पोलीस नाईक बालाजी पाटील ठरले हिरोसंशयित वाहनाचा तपास करत असताना पोलीस नाईक बालाजी पाटील यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात पैलवानकी करणारा ऋषिकेश पाटील याच्या मदतीने जयसिंगपूर व सांगलीतील संशयितांनी येऊन मोबाईल फेकण्याची माहिती पुढे आली. त्यातून हा उलगडा झाला. तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो. नि. तानाजी सावंत, सहा. पो. नि. विकास जाधव यांनीही विशेष परिश्रम घेतले.पाळेमुळे खणून काढणार : बलकवडेमोक्का कारवाईतील कळंबा कारागृहातील संशयित विकास खंडेलवाल (रा. इचलकरंजी) याच्यासाठी मोबाईल आत फेकल्याचे निष्पन्न झाले. संशयितांपैकी एकाला ताब्यात घेतले असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी गुन्हेगारांची साखळी उघडकीस आणणार असून, कारागृहातील कोणाचा यात सहभाग आहे का? याचीही कसून तपास करून प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

टॅग्स :jailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस