शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

पिराचीवाडीतील वैकुंठभूमी ठरतेय ‘मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:52 PM

म्हाकवे : मृत्यू कोणालाही सुटलेला नाही; परंतु मृत्यूनंतर अंत्यविधी हा पिराचीवाडी (ता. कागल) येथील सरपंच सुभाष भोसले यांच्या दूरदृष्टी आणि संकल्पनेतून नव्याने उभारलेल्या वैकुंठभूमीतच व्हावा, अशी धारणा येथील वैकुंठभूमीला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात होईल असे निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ व विस्तीर्ण परिसर गावच्या मुख्य प्रवेशद्वारावरच डोंगराच्या कुशीत उभारलेली ही वैकुंठभूमी होय.आमदार ...

म्हाकवे : मृत्यू कोणालाही सुटलेला नाही; परंतु मृत्यूनंतर अंत्यविधी हा पिराचीवाडी (ता. कागल) येथील सरपंच सुभाष भोसले यांच्या दूरदृष्टी आणि संकल्पनेतून नव्याने उभारलेल्या वैकुंठभूमीतच व्हावा, अशी धारणा येथील वैकुंठभूमीला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात होईल असे निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ व विस्तीर्ण परिसर गावच्या मुख्य प्रवेशद्वारावरच डोंगराच्या कुशीत उभारलेली ही वैकुंठभूमी होय.आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रेरणेतून केवळ सहा महिन्यांत पिराचीवाडी गावच्या कायापालटाचा ध्यास घेऊन सरपंच भोसले यांनी विकासकामांचा पाठपुरावा केला. त्यामुळे गावातील विकासकामांसाठी केवळ सहा महिन्यांत १ कोटी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. गावातील अनेक कामे सुरू आहेत.कागल तालुक्यातील उंच ठिकाण असणारे हे गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. मुळात निसर्गाचे वरदान लाभलेल्या याठिकाणी आमदार हसन मुश्रीफ यांचा फंड, जनसुविधा योजना, लोकसहभाग व १४ व्या वित्त आयोगातून १५ लाखांचा निधी खर्च करून वैकुंठभूमीची उभारणी केली आहे.गावापासून दोनशे मीटर अंतरावर उत्तरेला डोंगराच्या पायथ्याशी असणाºया मोकळ्या जागेत या वैकुंठभूमीची उभारणी केली आहे. १०० बाय ७० इतक्या क्षेत्रात आकर्षक स्वागतकमान, सर्वत्र पेव्हिंग ब्लॉक, नातेवाइकांना बसण्यासाठी सिमेंटची बाकडी, सावलीसाठी मोठ्या झाडांसह शोभेची फुलझाडे यामुळे या वैकुंठभूमीचे सौंदर्य पाहतच बसावे असे बनविले आहे. हे काम अत्यल्प काळात पूर्णत्वाकडे गेले आहे.दरम्यान, गावकºयांना येथील धुरासह राखेमधून कोणतेही प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच या वैकुंठभूमीच्या सहभोवती अत्याधुनिक चेनलिंगचे कंपाऊंड करण्यात आले आहे.मीही अचंबित झालो : मुश्रीफज्या-ज्या गावात राष्ट्रवादीची सत्ता आहे,तेथे दर्जेदार विकासकामे होण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न असतो. एखाद्या व्यक्तीने गावाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला तर काय बदल होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पिराचीवाडी गाव होय.सरपंच सुभाष भोसले यांनी गावात विकासाचे मॉडेल बनविले आहे. त्यांनी साकारलेली जिल्ह्यातील एकमेव वैकुंठभूमी पाहून तर मीही अचंबितच झालो. अशा कार्यपद्धतीला आपल्या नेहमीच शुभेच्छा आणि पाठबळ राहील, अशी प्रतिक्रिया देत आमदार हसन मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त केले.