मिरज : सर्व होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांसाठी आवश्यक असणारा मॉडर्न फॉमॉकोलॉजी (आधुनिक औषध निर्माण शास्त्र) अभ्यासक्रम राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांमध्ये सुरु करण्याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र आरोग्य विभाग विद्यापीठ, नाशिक यांनी काढली आहे. त्यामुळे होमिओपॅथिक व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना हा कोर्स पूर्ण केल्यानंतर रितसर वैद्यकीय व्यवसायाची संधी महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे.होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक उपचार पद्धतीचा व्यवसाय करण्यापासून अनेक बंधने होती. गेल्या ३० वर्षांपासून या डॉक्टर्सची मागणी होती. अद्यापही ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने अनेक रुग्णांना उपचारही होत नाहीत. त्यासाठी सातत्याने मोर्चे, निदर्शने व चर्चा या माध्यमातून आघाडी सरकारकडे सातत्याने मागणी करुन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकालात आॅगस्ट २०१४ मध्ये हा कोर्स पूर्ण करत या व्यावसायिकांना औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अटीवर हा व्यवसाय करण्याची परवानगी देण्याबाबत आदेश दिला होता. त्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत आदेश दिला असून, आॅगस्ट २०१६ पासून प्रथम टप्प्याला राज्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा कोर्स सुरू होणार आहे. हा कोर्स सुरू करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कल, केंद्रीय होमिओपॅथीचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे व सचिव पृथ्वीराज पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे.होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचार करण्यासाठी मान्यता देण्याच्या शासन निर्णयाचे होमिओपॅथी महाविद्यालयांच्या संघटनेचे सचिव पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केले. मिरजेतील गुलाबराव पाटील महाविद्यालयाने सर्वप्रथम होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचाराची परवानगी देण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रमहा नवा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून, अभ्यासक्रमाची कालावधी १०८ दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहून करावयाचा आहे आणि अभ्यासक्रमासाठी नोंदणीकृत होमिओपॅथिक महाविद्यालयांकडे नोंदणी करून प्रवेश मिळणार आहे. सध्या १३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात येईल. यामध्ये मिरज, कोल्हापूर, पुणे येथील शासकीय महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात येईल.
मॉडर्न फॉमॉकोलॉजी अभ्यासक्रमास मान्यता
By admin | Published: March 25, 2016 11:09 PM