शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

(सुधारित) एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:22 AM

कोल्हापूर : कमी पैशात ‘एमबीबीएस’ला प्रवेश देतो, असे सांगून सुमारे एक लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी वसंत ...

कोल्हापूर : कमी पैशात ‘एमबीबीएस’ला प्रवेश देतो, असे सांगून सुमारे एक लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी वसंत गणपती शेटे (रा. प्लॉट नं. ३६,३७. सरस्वती कॉलनी, बालिंगा रोड, कोल्हापूर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार परराज्यातील दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसंत शेटे यांनी आपल्या मुलीला एमबीबीएस करण्याचे स्वप्न पाहिले, त्यासाठी खर्चाचा ताळमेळ बसवत प्रवेशासाठीच्या जाहिरातींची माहिती घेत होते. त्याचेवेळी त्यांच्या मोबाइलवर ‘एमबीबीएस’ करिता ३० लाख रुपयांत प्रवेश, अशा वर्णनाच्या इंग्रजीतील जाहिरातीचा मेसेज आला. मेसेजमधील मोबाइल क्रमांकाची व्यक्ती सोहाना मॅडम यांना शेटे यांनी फोन करून ‘एमबीबीएस’ प्रवेशाबाबत चर्चा केली. चर्चेत सोहाना मॅडम यांनी दिलेल्या मोबाइल नंबरवर बिनयकुमार प्रशान यांच्याशी शेटे यांची चर्चा झाली. त्यावेळी बिनयकुमार प्रशान यांनी हा प्रवेश अहमदनगर अथवा नाशिकमधील महाविद्यालयात देण्याचे निश्चित झाले. प्रवेशासाठी तडजोड करून १२ लाख रुपये द्यावे लागतील मगच एमबीबीएसला प्रवेश देऊ असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी शेटे यांना बिनयकुमार प्रशान यांनी एका बँकेच्या बीडासांशी (कटक) शाखेत आपल्या खात्यावर तातडीने एक लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार शेटे यांनी आपल्या पत्नीच्या नावे बँक खात्यातून बिनयकुमार प्रशान यांच्या नावे पैसे जमा केले; पण त्यानंतरही एमबीबीएसचे प्रवेश न देता आणखी जादा पैशांची मागणी झाली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेटे यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सोहाना मॅडम व बिनयकुमार प्रशान (रा. माचुर्ली, पो. सलेपूर, कटक, ओडिसा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.