कोल्हापूर : अंबाबाईचे दर्शन घेऊन मुंबईला जात असताना मध्यवर्ती बसस्थानक येथे अचानक भोवळ येऊन बेशुद्ध पडलेल्या वृद्धाच्या मदतीला ‘माउली संस्था’ धावत आली. अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त असलेल्या ७८ वर्षीय निराधार वृद्धाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दिसणे, १८ भाषांचे ज्ञान असलेल्या या व्यक्तीची ओळख ‘ज्युनिअर मोदी’ म्हणून आहे. गेली दोन वर्षे अंथरुणाला खिळून पडलेले मोदी आता ठणठणीत आहेत. त्यांना पाहण्यासाठी सिने कलाकारांसह युवा वर्ग ‘माउली केअर सेंटर’ला भेट देत आहेत.अंबाबाईचे दर्शन घेऊन मुंबईला परतताना अचानक भोवळ येऊन ते जमिनीवर कोसळले. काही नागरिकांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. ज्यांनी रुग्णालयात दाखल केले ते निघून गेले होते. आपले पुढे काय हाच प्रश्न त्यांना सतावत होता. विचार करता-करता ते बेशुद्ध पडले. जेव्हा शुद्ध आली तेव्हा ते ‘सीपीआर’मध्ये नव्हे तर माउली केअर सेंटरमध्ये होते. याच केअर सेंटरमुळे जिवंत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. हुबेहूब मोदींसारखेच दिसत असल्यामुळे त्यांना ‘ज्युनिअर मोदी’ म्हणून ओळखतात.कोल्हापुरातील संभाजीनगर बसस्थानकाशेजारी असणाऱ्या ‘माउली केअर सेंटर’ हे दीपक संभाजी कदम, त्याचा भाऊ राहुल हे चालवितात. त्यांना आई मंगल, वडील संभाजी, मामा विनोद पवार मदत करतात. गेली साडेपाच वर्षे विविध आजारांनी त्रस्त असलेल्या ३७० वृद्धांची निशुल्क सेवा करून त्यांना संजीवनी दिली आहे. आजही ते ९५ पेक्षा जास्त निराधारांचा मायेने सांभाळ करत आहेत.मदतीचे आवाहन...ज्यांना कोणी नाही, त्यांना मायेचा आधार देणाºया या ‘माउली केअर सेंटर’ला आर्थिक मदतीची गरज आहे. या संस्थेला शासकीय किंवा निमशासकीय मदत नाही. स्वखर्चातून कदम कुटुंबीय सेवा करीत आहेत. रक्तातीलनात्यांपेक्षा जोडलेली नातीच संकटकाळीमदतीला धावतात, हे ‘माउली’च्या सेवाभावी वृत्तीतून दिसून येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.
मुंबईच्या ‘मोदी’ला ‘माउली’मुळे जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 1:17 AM