कसबा बावडा : कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर पार पडलेल्या बावडा प्रीमियर फुटबॉल लीग स्पर्धेचे विजेतेपद मोहन सालपे स्पोर्ट्सने पटकाविले. अंतिम सामन्यात सालपे स्पोर्ट्सने रावजी चहा स्पोर्टसवर १-० गोलनी मात केली. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या संघास ११ हजार १११ रुपये व चषक प्रदान करण्यात आला. अत्यंत अटीतटीने झालेल्या अंतिम सामन्यात उत्तरार्धात सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना मोहन सालपे स्पोर्ट्सकडून कर्णधार प्रवीण उगारे याने फ्री किकवर गोल नोंदविला. या गोलच्या बळावर सालपे स्पोर्ट्सने विजय नोंदविला. बक्षीस समारंभ प्रसंगी श्रीराम सोसायटीचे चेअरमन धनाजी गोडसे, माजी नगरसेवक मोहन सालपे, अजित पवार, रोहन पाटील, संजय पाटील, गजानन बेडेकर, सचिन पाटील उपस्थित होते.
स्पर्धेतील इतर बक्षिसे पुढीलप्रमाणे : मॅन ऑफ द मॅच प्रवीण उगारे (सालपे स्पोर्ट्स), मॅन ऑफ द सिरीज - साहिल कसबेकर (रावजी चहा स्पोर्ट्स), बेस्ट डिफेन्स - ओंकार जाधव (उलपे डेअरी स्पोर्ट्स), बेस्ट फॉरवर्ड - सुजल रणदिवे (उलपे डेअरी स्पोर्ट्स), बेस्ट हाफ - अनिकेत बेडेकर (गजानन बेडेकर स्पोर्ट्स), बेस्ट गोलकिपर- हरीश काळे (गुरु स्पोर्ट्स), शिस्तबद्ध संघ - संभाजी जाधव स्पोर्ट्स