शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

मोहिनी अस्त्र अन् मुरब्बी चंद्रकांतदादा !

By admin | Published: October 03, 2016 12:52 AM

कागलमधील कार्यक्रम : दादा मुख्यमंत्री होणार : मंडलिक, मुश्रीफांचे भाकीत

जहाँगीर शेख ल्ल कागल श्री शिवाजी सहकारी सेवा सोसायटीच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ, प्रा. संजय मंडलिक, समरजितसिंह घाटगे ही राजकीय मंडळी एकाच व्यासपीठावर आली. अपेक्षेप्रमाणे प्रत्येकाने राजकीय कोट्या केल्या. कागलच्या राजकीय विद्यापीठाला परिचित असणाऱ्या कौतुकाच्या राजकीय मोहिनी अस्त्राचा वापर प्रामुख्याने मुश्रीफ-मंडलिकांनी केला. मात्र अत्यंत स्थिरप्रज्ञ राहात चंद्रकांतदादांनी आपल्यातील मुरब्बी राजकारण्याचे दर्शन या विद्यापीठाला घडविले. मुळात पालकमंत्री पाटील आणि माजी मंत्री मुश्रीफ हे एका व्यासपीठावर येणार, तेही कागलमध्ये आणि सोबतीला मंडलिक-घाटगे असणार हाच राजकीय चर्चेचा विषय होता. कागलच्या आताच्या आणि यापूर्वीच्या राजकीय नेत्यांनी मान्यवर आणि ताकदवान नेत्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत, आणि त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगत, अनेकांना अक्षरश: गुंडाळलेले आहे. चंद्रकांतदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी या विषयाला धरून ‘मोहिनी अस्त्राची’ पहिली सुरुवात प्रा. मंडलिकांनी केली. दादा दोन चार दिवसांत मुख्यमंत्री होतात का? अशी परिस्थिती दिसत आहे. यापूर्वी मंडलिकसाहेब, खानविलकर, मुश्रीफसाहेब मंत्री झाले, पण दोन नंबरचे महसूलमंत्री, बांधकाममंत्री अशी खाती फक्त दादांनाच लाभली आहेत. समरजितसिंह घाटगेंनी शाहू साखर कारखाना बिनविरोध करण्याचे श्रेय नेत्यांना देत आमच्यासाठी चंद्रकातदादा आजही सहकारमंत्री आहेत. सहकारी संस्था जपण्यासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवतो, अशी राजकीय विद्यापीठाची महतीही सांगितली. आमदार मुश्रीफांनी सांगितले की, माझ्या वडिलांनी लहानपणी दत्तम भट्टाला माझी कुंडली विचारली होती. तेव्हा भटजीने सांगितले होते की, हा शिकेल की नाही हे माहीत नाही, पण मंत्री जरुर होईल. ‘दादा’ तुम्ही कुंडलीत बघा. मुख्यमंत्रिपद जरूर असावे, असे दिसते. अडीच तीन वर्षांपूर्वी कोणाला वाटले होते का? की चंद्रकांतदादा इतके वजनदार मंत्री असतील! दादा मुख्यमंत्री व्हावेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र या मोहिनी अस्त्राचा कोणताही इफेक्ट न होऊ देता राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला,मंत्र्याला साजेसे विकासात्मक धोरणात्मक भाषण करीत मुरब्बी राजकारण्यांचे दर्शन घडविले, आणि जाता जाता इशारा देत म्हणाले, चांगल्या कामासाठी जरूर एकत्र येऊ पण निवडणूक ही निवडणूकच असते.