शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मोकाट कुत्र्यांची झुंडशाही! . नागरिकांत दहशत : अनेकजण जखमी; प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्तच-कुत्र्यांचा जोर... नागरिकांना घोर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:12 AM

जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा ना महानगरपालिेकला, ना नगरपालिका, ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे. या कुत्र्यांच्या दहशतीचा वेध घेणारी मालिका आजपासून...

जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा ना महानगरपालिेकला, ना नगरपालिका, ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे. या कुत्र्यांच्या दहशतीचा वेध घेणारी मालिका आजपासून...चंंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : शिरोलीत (ता. हातकणंगले) मंगळवारी २७ जणांना कुत्र्याने चावा घेतला. सोमवारी हळदीत (ता. करवीर) कुत्र्याने दोघाजणांना जखमी केले. कोल्हापूर शहरातही पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेवून जखमी केले आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी जयसिंंगपूर येथे सलग तीन दिवस पिसाळलेले कुत्रे धुमाकूळ घालत होते. येथे रेबीजची लागण होऊन एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे. अशा घटना घडल्यानंतर दोन-चार दिवस त्या परिसरात कुत्री पकडण्याची मोहीम राबविली जाते. त्यानंतर सारे काही शांत होते.

भटक्या कुत्र्यांची समस्या इतकी गंभीर असूनही कायमस्वरुपी इलाज करण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही. नागरिकांना रात्री शहरात जीव मुठीत धरूनच फिरावे लागते. कारण कोपऱ्या-कोपºयावर विशेषत: चिकन, मटनाची दुकाने, चायनीजचे गाडे जिथे आहेत. त्या परिसरात ही कुत्री टोळीने असतात. मुले किंवा माणूस दिसला की हल्ला करतात.गेल्या आठ वर्षांत नसबंदीच नाहीमोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याला किंवा त्यांना ठार मारण्याला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे अशा कुत्र्यांची नसबंदी करुन त्यांचे प्रजोत्पादन होवू न देणे हाच एकमेव उपाय आहे. पण हा उपाय खर्चिक असल्याने त्याचा अवलंब केला जात असल्याचे अपवादानेच दिसते. महापालिकेने तर २००९-१० मध्ये कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबविली होती. त्यानंतर तब्बल आठ वर्षे याकडे दुर्लक्ष केले आहे. या आठ वर्षात कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमारात वाढली आहे.२० हजारांवर कुत्री; महापलिकेला पत्ताच नाहीकेवळ कोल्हापूर शहरात २० हजारांवर भटकी कुत्री असल्याचे पशुसंवर्धन विभागाची २०१५ ची आकडेवारी सांगते. महापालिकेकडे मात्र शहरातील भटक्या कुत्र्यांची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. २०१२ च्या पशूगणनेनुसार कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मिळून एकूर ४३ हजार ७६७ कुत्री आहेत. गेल्या सहा वर्षात या कुत्र्यांची संख्या किमान दुप्पट झाली असावी असा स्वयंसेवी संस्थांचा अंदाज आहे. यावरुन या प्रकरणाचे गांभीर्य समजते.निधीचा अडसर : मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी स्वतंत्र आॅपरेशन थिएटर, स्वतंत्र डॉक्टर आणि त्यांना सहाय्यक कर्मचारी तसेच कुत्री पकडण्यासाठी डॉगव्हॅनची आवश्यकता असते. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी लागतात. महापालिकेने गेल्या आठ वर्षात यातले काही केले नाही. नाही म्हणायला कुत्री पकडण्यासाठी कर्मचाºयांचे एक पथक आणि एक डॉग व्हॅन होती. मात्र ती ही चांगल्या दर्जाची नव्हती. या पथकासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसणे ंहेच यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते. अखेर जीवरक्षा अ‍ॅनिमल ट्रस्ट केअर या स्वयंसेवी संस्थेने मोफत शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापलिकेने जून महिन्यापासून नसबंदीस सुरुवात केली आहे. (क्रमश:)

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्राgovernment schemeसरकारी योजना