(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील निर्माण झालेल्या अडचणी व भेडसावणाऱ्या समस्या यासंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करणे. शासनाने मंजूर केलेल्या योजनांची अंमलबजावणी व विविध बाबींवर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सोमवारी (दि.२८) सकाळी अकरा वाजता इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये सर्व यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलवली आहे.
मंदी व त्यापाठोपाठ लॉकडाऊन यामुळे वस्त्रोद्योगात आणखीच अडचणीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत पंधरा दिवसांत दोन यंत्रमागधारकांनी आत्महत्या केली. त्यामुळे वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे. अशा बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करत वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजना व मार्ग याबाबत चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर ताराराणी पक्षाच्या कार्यालयात काही यंत्रमागधारकांसोबत आमदार आवाडे यांनी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील, विकास चौगुले, गोपाळ उरणे, जनार्दन चौगुले, दिगंबर रेडेकर, आदी उपस्थित होते.
(फोटो ओळी)
२५१२२०२०-आससीएच-०४
ताराराणी पक्षाच्या कार्यालयात काही यंत्रमागधारकांसोबत आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील, विकास चौगुले, गोपाळ उरणे, जनार्दन चौगुले, दिगंबर रेडेकर, आदी उपस्थित होते.