येथील एस. के. पाटील महाविद्यालयाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य फी वसूल करत असल्याच्या कारणावरून संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यार्थी युवा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयावर मोर्चा काढून प्राचार्य वाय. एम. चव्हाण यांना घेराव घालण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि महाविद्यालय कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस वेळेत हजर झाल्याने तणाव निवळला. मोर्चाचे नेतृत्व विद्यार्थी युवा संघर्ष समिती राज्याध्यक्ष योगेश कवठेकर व उपाध्यक्ष धम्मपाल ढाले यांनी केले.
दरम्यान, महाविद्यालयाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य वसूल केलेली फी त्वरित परत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मागासवर्गीय फी वरून संस्थाचालक आणि विद्यार्थी यांच्यात वाद चिघळण्याची शक्यता आहे.
चौकट
महाविद्यालय विद्यार्थ्यांना ज्या सोयी उपलब्ध करून देतात आणि शासनाकडून रक्कम मिळत नाही त्याचीच फी घेत आहेत. महाविद्यालयाने कोणतीच फी आकारु नये, अशी आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याबाबत संस्थाचालकाबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
वाय. एम. चव्हाण
प्राचार्य एस. के. पाटील महाविद्यालय
फोटो - कुरुंदवाड एस. के. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य वाय. एम. चव्हाण यांना विद्यार्थी युवा संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष योगेश कवठेकर यांनी जाब विचारला. यावेळी धम्मपाल ढाले व महाविद्यालय विद्यार्थी.