अब्दुललाट : पूरग्रस्तांचा चुकीचा पंचनामा करून त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच सानुग्रह अनुदानापासून वंचित आहेत त्यांना लाभ मिळवून द्यावा, या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेने तलाठी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन मंडल अधिकारी डी. बी. गायकवाड यांना दिले. मोर्चामध्ये जि. प. सदस्य विजय भोजे, दीपक तराळे, सतीश कुरणे, शीतल कुरणे, सुमती शेट्टी, राजू नाईक, नीलेश कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यावर गायकवाड म्हणाले, सानुग्रह अनुदानापासून जे लाभार्थी वंचित राहिले आहेत, त्यांची यादी ९ सप्टेंबरपर्यंत पाठवून देऊन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी देवेंद्र कांबळे, ग्रामसेवक राहुल माळगे, पोलीसपाटील मानसिंग भोसले, गणेश सोनवणे, आदी उपस्थित होते.
अब्दुललाटमध्ये तलाठी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:28 AM