कोल्हापूर : येथील डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीअंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा इंटेरिअर डिझाईनविषयी महाविद्यालयात मुलांनी वर्षभरात तयार केलेल्या सजावटीच्या सुमारे १५० हून अधिक कलाकृती ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनात सादर केल्या आहेत. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारपासून सुरू झालेले हे प्रदर्शन सोमवार (दि. १७) पर्यंत खुले राहणार आहे.‘रचनाभद्राय’ या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी, ग्राहकांच्या मनातील कल्पना ओळखून नवसंकल्पना सजविण्याचा प्रयत्न करावा. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून घरांची सजावट करावी, असा सल्ला दिला.
यावेळी आर्किटेक्ट प्रकाश चांडक यांच्यासह प्रमोद बेरी, सुभाष कुलकर्णी, आर. आर. जोशी, रमेश पोवार, प्रकाश देवलापूरकर, प्राचार्य सीमा मुलाणी, प्रांजली कुलकर्णी, निशिकांत गोखले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीअंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा इंटेरिअर डिझाईन याविषयी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर या विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध सजावटीच्या कलाकृतींचा या प्रदर्शनात समावेश केला आहे.