कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक झाली आहे. जिल्ह्यात नवे १३३७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून १४५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या दीड महिन्यांमध्ये जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडला असताना पहिल्यांदा पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. मृत्यूही कमी होऊन ३८ वर आले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २७२ रुग्ण कोल्हापूर शहरातील असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात १८०, हातकणंगले तालुक्यात १५३, तर इतर जिल्ह्यांतील १३१ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत.
चौकट
कोल्हापुरात केवळ दोनच मृत्यू
कोल्हापूर शहरातील केवळ दोनच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याआधी शहरातील मृतांची सख्या अधिक असायची. मात्र, करवीर तालुक्यातील कोरोना मृतांचा आकडा कमी येत नाही.
करवीर ११
प्रयाग चिखली, पाचगाव २, कणेरी, कळंबा, सांगवडे, भामटे, गाडेगोंडवाडी, मणेरमळा, उजळाईवाडी, कंदलगाव
हातकणंगले ०६
हातकणंगले, रूकडी, चंदूर २, हालोंडी, हुपरी
इचलकरंजी ०५
शहापूर, जवाहरनगर, सुदर्शन चौक, कारंडे मळा, इचलकरंजी
शिरोळ ०३
टाकवडे, तेरवाड, शिरटी
पन्हाळा ०२
बोरवडे, पन्हाळा
कोल्हापूर ०२
शिवाजी पेठ, मंगळवार पेठ
गडहिंग्लज ०२
दुंडगे, गडहिंग्लज
राधानगरी ०१
खेरिवडे
आजरा ०१
सुळे
कागल ०१
सुळकुड
इतर ०४
रेठरे धरण वाळवा, तुंग, फोंडा घाट, कुडाळ