कोल्हापूर : जिल्ह्यात १,१५८ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून, २३ जणांचा मृ़त्यू झाला आहे. तर १,२१७ जणांनी काेरोनावर मात केली आहे. सध्या १३ हजार ४४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर शहरातील २१२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, करवीर तालुक्यातील २०४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. करवीर, हातकणंगले आणि कागल तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढती असल्याचे सोमवारी आकडेवारीवरून दिसून आले.
कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी चौघांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला असून, आजरा तालुका आणि इचलकरंजीतील प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार १२४ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातील १,१५८ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आता चार वाजेपर्यंत सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याने परिस्थितीमध्ये काय फरक पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
तालुकावार मृत्यू
कोल्हापूर ०४
लाईन बाजार, लक्षतीर्थ वसाहत, कसबा बावडा, सुर्वे नगर
करवीर ०४
देवाळे, जठारवाडी, बहिरेश्वर, सरनोबतवाडी
आजरा ०३
आजरा, मुमेवाडी, कागिनवाडी
इचलकरंजी ०३
शिरोळ ०२
टाकवडे, जैनापूर
गडहिंग्लज ०२
भडगाव, नूल
पन्हाळा ०२
पन्हाळा, बोरगाव
हातकणंगले ०१
सावर्डे
कागल ०१
रणदिवेवाडी
इतर जिल्हा ०१
हडलगे
चौकट
अहवाल लवकर येण्यासाठी प्रयत्न
कोरोनाचे अहवाल लवकर यावेत, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांनी सोमवारी दिली. दोन दिवसांपूर्वीची स्थिती पाहता अहवाल येण्यासाठी चार, पाच दिवस लागत हाेते. परंतु, याबाबत थायरोकेअरच्या प्रयोगशाळेतील संबंधितांशी बोलणे झाले आहे. त्यामुळे सोमवारचा विचार करता केवळ ४८ तासांतील अहवाल प्रलंबित आहेत.
चौकट
आणखी एका प्रयोगशाळेचा प्रस्ताव
तिसऱ्या लाटेचा विचार करता, आणखी एका प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्हा पातळीवरच अधिकाधिक चाचण्यांचे अहवाल मिळावेत, यासाठी आणखी एका प्रयोगशाळेचा प्रस्ताव मागविण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.