अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या शहरात एकूण १४६८० जागा आहेत. त्यावरील प्रवेशासाठी १२९६१ अर्ज दाखल झाले. पहिल्या फेरीत या तिन्ही विद्याशाखेतून ५८३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यानंतर उरलेल्या ९४७६ जागांवरील प्रवेशासाठी दुसरी फेरी सुरू झाली. ६८९४ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची मागणी केली. या फेरीतील प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सोमवार(दि. २१)पासून सुरू झाली. त्याची मुदत बुधवारी संपली. या फेरीत एकूण १०३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यात विज्ञान शाखेचे ६१०, वाणिज्य इंग्रजीच्या ३३९, वाणिज्य मराठीच्या ६६, कला मराठीच्या २१, तर कला इंग्रजीच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही दुसरी फेरी अंतिम असून, ती संपल्याने आता केंद्रीय समितीकडून कोणताही प्रवेश केला जाणार आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण प्रवेश क्षमता : १४६८०
दाखल अर्ज : १२९६१
एकूण निश्चित झालेले प्रवेश : ६८७३
रिक्त जागा : ७८०७
चौकट
‘त्या’ विद्यार्थ्यांना महाविद्यालय पातळीवर प्रवेश
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेत कोल्हापूरमधील ३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. काही एटीकेटीधारक विद्यार्थीही आहेत. त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया महाविद्यालय पातळीवरून होणार आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले यांनी केले.