शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

मोरे, कामत रिंगणात

By admin | Published: September 16, 2014 12:34 AM

घुमान : साहित्य संमेलनाध्यक्षपदावरुन वाद

पुणे/कोल्हापूर : पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी पुण्यात अर्ज दाखल केला तर डॉ. अशोक कामत यांनी कोल्हापूरमध्ये उमेदवारी जाहीर केली.साहित्य संमेलनाची निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटते, परंतु प्रक्रिया सुरू झाली असून पुढच्या संमेलनासाठी संमेलनाध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा विकसित करता येईल,असे मत डॉ. मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्यांनी सोमवारी पुण्यातील साहित्य परिषदेच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. घुमानचे संमेलन हे सांस्कृतिकदृष्ट्या, राष्ट्रीयदृष्ट्या ऐतिहासिक आहे. संत साहित्याशीच नव्हे तर मराठी साहित्यातील प्रत्येक प्रवाहात त्यांचा संदर्भ आहे. सांस्कृतिक निवडणुका या राजकारणातील निवडणुकांप्रमाणे नसाव्यात यासाठी मोरे यांना पाठिंबा दिल्याचे सूचक असलेले डॉ. सबनीस म्हणाले. मोरे यांना प्रकाशक परिषदेचा नव्हे तर माझा वैयक्तिक पाठिंबा असल्याचे अनुमोदक अरूण जाखडे यांनी सांगितले. प्रकाशक परिषद आणि साहित्य महामंडळातील वादावर तोडगा काढण्यासाठी वात्रटिकाकार रामदास फुटाणे प्रयत्नशील आहेत, त्यातून काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) निवडणूक बिनविरोध व्हावीसाहित्य संमेलनाची निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटते, परंतु आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढच्या संमेलनासाठी संमेलनाध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा विकसित करता येईल.- डॉ. सदानंद मोरेमाघार नाही.. सदानंद मोरे यांच्याशी माझे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. संमेलनाध्यक्षपद निवडणुकीतूनच निवडले जाते. मी कुणाच्या विरोधात नाही, तर त्यांच्या बरोबरीने निवडणुकीसाठी उभा आहे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही. - डॉ. अशोक कामतनिवडणूक बिनविरोध व्हावीसाहित्य संमेलनाची निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटते, परंतु आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढच्या संमेलनासाठी संमेलनाध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा विकसित करता येईल.- डॉ. सदानंद मोरेमाघार नाही.. सदानंद मोरे यांच्याशी माझे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. संमेलनाध्यक्षपद निवडणुकीतूनच निवडले जाते. मी कुणाच्या विरोधात नाही, तर त्यांच्या बरोबरीने निवडणुकीसाठी उभा आहे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही. - डॉ. अशोक कामत