बुधवारी दुपारी लागलेली आग कडक उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे क्षणार्धात सर्वत्र पसरली. ही आग इतकी भीषण होती की, ती विझवणे कठीण झाले. बंडू चोथे, रणजित चव्हाण, बाबू पाटील, पांडुरंग लांडे, संतोष कांबळे, वसंत केसरकर, शंकर केसरकर, मोहन कांबळे, सखाराम कांबळे, चंद्रकांत कांबळे, आनंदा अस्वले, इंदर कांबळे, बाळू रेडेकर, लक्ष्मण चव्हाण, विठ्ठल चव्हाण या शेतकऱ्यांच्या गंजी जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे, तर याच परिसरात असलेल्या काजूच्या २० झाडांनाही आग लागल्याने एक लाखावर नुकसान झाले आहे. सर्व ग्रामस्थांनी आग विझविण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. त्याचप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
फोटोकॅप्शन- गजरगाव (ता. आजरा) येथे लागलेली आग.