शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

धर्म, राज, अर्थसत्ता एकत्र आल्यास अधिक हिंसक; ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 12:36 PM

चार्वाक ते पानसरे विचारधारा विवेकाची

कोल्हापूर : धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता एकत्र आल्यास त्या अधिक हिंसक बनतात. त्याचा विरोध केल्यास विचारवंताचा खून केला जातो. तुरुंगात डांबले जाते. विवेकाचा बळी घेतला जातो. अंधश्रद्धेला खत-पाणी घातले जाते. चार्वाक ते पानसरेंपर्यंतच्या विचारधारांनी विवेक जोपासला. त्यांनी दिलेल्या विवेकवादी विचारांसह जगातील सर्वांत मोठा धर्म असलेल्या मनुष्यधर्माची जोपासना करा. कालसाक्षेपतेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आणि ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे सोमवारी केले.डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृतहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेल्या व्याख्यानास तुडुंब गर्दी उसळली होती.

‘चार्वाक ते पानसरे’ या विषयावर द्वादशीवार यांनी श्रोत्यांना विचारशील बनवणारी मांंडणी सुमारे तासभर केली. ते म्हणाले, सध्या देशभरात अडीच लाख लोकांना केवळ चौकशीच्या नावाखाली तुरुंगात डांबले गेले. विवेकवादी विचारांच्या सर्व खुनांचे सूत्रधार एकाच विचारधारेचे आहेत. समाजात सत्ताधाऱ्यांची सत्ता मजबूत करण्याचे काम धर्म करतो. एखादा अपवाद वगळता जगातील कोणत्याही धर्माने महिलांना आणि गरिबांना न्याय दिलेला नाही. धर्माचा मोठा पगडा समाजावर असल्याने त्याची सत्यता कधीच पडताळून पाहिली जात नाही. चार्वाक हे अनुभवाचे पक्के होते. चार्वाक आणि अनुभव आद्यधर्म आहे. कोणीही काहीही सांगितले तरी त्याच्यावर पटकन विश्वास ठेवू नका. अनुभवाच्या कसोटीवर जुने आणि नवे तपासण्याची विचारधारा चार्वाक ते पानसरे या विचारवंतांनी दिली.

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी मनोगत व्यक्त केले. द्वादशीवार यांनी ‘महात्मा गांधी ॲण्ड क्रिटिक्स’ हा इंग्रजी ग्रंथ डॉ. लवटे यांना भेट दिला. डॉ. बी. एम. हिर्डेकर, समितीचे सचिव डॉ. विश्वास सुतार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. समितीचे खजिनदार प्रभाकर हेरवाडे यांनी स्वागत केले. समितीचे अध्यक्ष डाॅ. जी. पी. माळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. निशांत गोंधळी यांनी आभार मानले.

धर्म, राजकारणी लबाडजगातील प्रत्येक धर्माने आपल्या सोयीनुसार राजकारण केले. त्या-त्या काळाच्या सोयीनुसार धर्मग्रंथात लबाडी केल्या गेल्या. माणुसकीचा धर्म जोपासा अन्यथा केवळ पुण्यतिथी साजरी करणारे अनुयायी म्हणून जगू नका, असेही द्वादशीवार यांनी सांगितले.

अनुभव असाही..हल्ली कोण पुस्तके वाचत नाहीत, व्याख्यानाला येत नाहीत अशी तक्रार समाजात वारंवार ऐकायला मिळते; परंतु वक्ता समाजाला दिशा देणारा असेल तर सभागृहात बसायला जागा राहत नाही याचेच प्रत्यंतर द्वादशीवार यांच्या व्याख्यानावेळी आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर