कोल्हापूर : नागाळा पार्कातील नाग मंदिरच्या पाठीमागील बाजूच्या गटारात सांडपाणी साठून राहिले आहे. त्यात डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्याने परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. उच्चभ्रू वस्ती असूनही याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.
नागाळा पार्क उच्चभ्रूची वसाहत म्हणून ओळखली जाते. तेथे जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बंगल्याच्या परिसरातील गटार नेहमी तुंबलेल असते. गटारची खुदाई केल्याने सांडपाण्याला प्रवाह नाही. गटार बंदिस्त नसल्याने तुंबलेल्या पाण्याची दुर्गंधीही सुटली आहे. अशा पाण्यात सध्या डासांची निर्मिती झाली आहे. डासांची उत्पत्तीस्थान बनल्याने परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजाराचे रुग्ण मिळत आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने साठलेले पाणी वाहते राहण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
कोट
नागाळा पार्कातील जि. प. अध्यक्षांच्या बंगला परिसरातील गटार तुंबले आहे. तेथील पाण्यात डासांची निर्मिती झाल्याने परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे.
डॉ. सुभाष आठले, रहिवासी
फोटो : ०४०७२०२१-कोल- नागाळा पार्क गटार
कोल्हापुरातील नागाळा पार्कातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगला परिसरात अशाप्रकारे गटारात सांडपाणी तुंबले आहे.