कोल्हापूर : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे आकडे वाढू लागल्याने धास्ती वाढू लागली आहे. त्यात करवीर तालुक्याने पुन्हा एकदा आघाडी घेतली असून तब्बल महिनाभरानंतर कोल्हापूर शहर रुग्णसंख्येच्या बाबतीत पहिल्यावरून दुसऱ्या स्थानावर आले आहे. रविवारी नवे १९५१ रुग्ण आढळले. रुग्ण वाढत असताना मृत्यू मात्र घटल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. २७ जणांनी रविवारी प्राण गमावले, त्यातील एक पश्चिम बंगाल व एक आंबोलीचा आहे.
शनिवारी १७७६ असणारी रुग्णसंख्या रविवारी एकदम १९५१ वर गेल्याने धास्ती वाढली आहे. कोल्हापूर शहरात सातत्याने आकडा साडेतीनशे ते चारशेच्या टप्प्यापर्यंत राहिला आहे. रविवारी हा आकडा ४१९ वर गेला असला तरी, त्यातुलनेत करवीर तालुक्यात सर्वाधिक ४३८ रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील हा उच्चांकी आकडा असल्याने आरोग्य यंत्रणा हडबडली आहे. करवीरबरोबरच हातकणंगले, कागल, पन्हाळा, शिरोळ, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड या तालुक्यांतही संसर्गाचा वेग वाढू लागला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात तपासण्यांचा वेग वाढवला असल्याने आकडे वाढत असल्याचे सांगण्यात येत असले तरी देखील, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात निर्बंध थोडेफार शिथिल असून व्यवहार बऱ्यापैकी सुरू असल्याने लोकांचा सार्वजनिक वावरही वाढला आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात कधी शून्यावर, तर कधी एकदम कमी रुग्णसंख्या झालेल्या तालुक्यातही आता कोरोनाने पुन्हा कहर सुरू केला आहे.
आज झालेले मृत्यू...
कोल्हापूर शहर : मुख्य पोस्ट, मुक्ताईनगर, राजारामपुरी,
करवीर : शिरोली दुमाला, पाचगाव, वडणगे,
गडहिंग्लज : बेकनाळ,
आजरा : हरपेवाडी, आजरा,
कागल : बोळावी
चंदगड : हाजगोळी,
हातकणंगले : हेर्ले, रेंदाळ, इंगळी, रुई, इचलकरंजी
पन्हाळा : कुशिरे, वारणानगर,
भुदरगड : गारगोटी,
शिरोळ : चिंचू, नांदणी,
इतर जिल्हा : आंबोली (जि. सिंधुदुर्ग), पश्चिम बंगाल,