शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

आई अंबाबाई, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढ, देवीला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 6:32 PM

‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा व ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. देवीचा प्रसाद देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांनी दर्डा बंधूंचा हृद्य सत्कार केला.

ठळक मुद्देआई अंबाबाई, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढ, देवीला साकडे ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा, एडिटोरियल चीफ राजेंद्र दर्डा देवीच्या चरणी

कोल्हापूर : ‘आई अंबाबाई, परतीच्या पावसाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढ; राज्याला लवकरच नवे कल्याणकारी सरकार मिळू दे,’ अशी प्रार्थना ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा व ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेत केली. देवीचा प्रसाद देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांनी दर्डा बंधूंचा हृद्य सत्कार केला.‘लोकमत’ भेटीसाठी आलेल्या विजय दर्डाराजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. मंदिराच्या परिसरातील इतर देवीदेवतांच्या मंदिरांची त्यांनी पाहणी केली. देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांनी त्यांना समितीच्या कार्याबद्दलची माहिती दिली. देशातील तीन शक्तिपीठांपैकी एक पीठ इतके मोठे या देवीचे माहात्म्य आहे.

मंदिराला खूप प्राचीन इतिहास आहे; परंतु तरीही या देवीचे माहात्म्य देश-परदेशांत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो आहोत. शिर्डी देवस्थानच्या तुलनेत अंबाबाईचे उत्पन्न कमी आहे. आता गेल्या तीन वर्षांत आम्ही सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न वाढविले असून, आता ते २२ कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले. देवस्थानच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम चालविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, प्रेसिडेंट (अ‍ॅड, सेल्स) करुण गेरा, उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे, साहाय्यक उपाध्यक्ष (एचआर) बालाजी मुळे, साउथ महाराष्ट्र हेड (जाहिरात) अलोक श्रीवास्तव, ‘लोकमत’ कोल्हापूरचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.देवीची दूरदर्शन मालिका करणारजय मल्हार, बाळूमामासारख्या दूरदर्शन मालिकांप्रमाणेच अंबाबाई व जोतिबाचे माहात्म्य भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्याही मालिका करण्याचा मनोदय अध्यक्ष जाधव यांनी व्यक्त केला.‘लोकमत’चे कौतुकअंबाबाईच्या दर्शनरांगेत असलेल्या एका भाविक महिलेने विजय दर्डा यांना ओळखले व मध्येच अडवून त्यांना नमस्कार केला. कोल्हापुरात ‘लोकमत’चा अंक चांगला निघत असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

टॅग्स :LokmatलोकमतMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरRajendra Dardaराजेंद्र दर्डाVijay Dardaविजय दर्डा