दत्ता लोकरेसरवडे: भल्यामोठ्या पगारांच्या नोकऱ्या असताना वृध्दाश्रमात ठेवणारी मुले आहेत. तर बऱ्याच आई- वडिलांची उतारवयात हळसांड होत आहे. मात्र कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता असलेल्या मुलाने आई वारल्यानंतर पालखीतून अंत्ययात्रा काढायची म्हणून एक वर्षे आधीच पालखी करुन घेतली. काल, बुधवारी आईचे निधन झाल्यावर या पालखीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. याची चर्चा सर्वत्र होत आहे.उंदरवाडी येथील श्रीमती भगिरथी शिवाजी पाटील यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. आईने परिस्थिती नसताना मोलमजुरी करुन आपला सांभाळ केला. खूप कष्ट सोसले त्यामुळे मी कमवता झालो तसा तिला काही कमी पडू दिले नाही. तिला विचारुन तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण केल्या. तर काही दिवसापूर्वीच सर्व नातेवाईकांना बोलावून आईचे पाद्यपूजन कार्यक्रम केला. निधनानंतर सुद्धा पालखीतून अंत्ययात्रा काढणार असे ठरवले. त्यानंतर सरवडे येथील सुतार बंधूकडे पालखी बनवण्यासाठी सांगितले. पाखली एक वर्षे तयार होती. आईचे निधन झाल्यावर तिची अंत्ययात्रा काढली असे मुलगा मारुती पाटील यांनी सांगितले.भगिरथी ह्या उंदरवाडी गावच्या सरपंच अनिता पाटील यांच्या सासू व सामाजिक कार्यकर्ते मारुती पाटील यांच्या मातोश्री आहेत. रक्षाविसर्जन उद्या शुक्रवारी आहे.
Kolhapur: चक्क पालखीतून काढली आईची अंत्ययात्रा, एक वर्षे आधीच करुन घेतली पालखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 1:12 PM