शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कोल्हापूरात संपत्तीच्या वादातून आईचा चिरला गळा; मुलास अटक

By admin | Published: June 12, 2017 6:57 PM

आर. के. नगर येथील घटना : वेडाच्या भरात कृत्य, पोलिसांची माहिती

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १२ : उद्योग व्यवसायासाठी सतत पैशाची मागणी करणाऱ्या क्रूर मुलाने संपत्तीच्या वादातून स्वत:च्या वृद्ध आईचा सुरीने गळा चिरला. एवढ्यावर न थांबता पोट, छाती, कमरेवर असे आठ वार केल्याने ज्योती अमरसिंह माने (वय ७५) या गंभीर जखमी झाल्या. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आर. के. नगर येथे घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योती यांना त्यांच्या पतीने तत्काळ सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलविले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकाराची माहिती समजताच करवीर पोलिसांनी संशयित मुलगा पृथ्वीराज अमरसिंह माने (वय ४७) याला अटक केली. त्याच्याकडून रक्ताने माखलेला सुरा ताब्यात घेतला. दरम्यान, संशयित पृथ्वीराज माने हा वेडसर आहे. त्याच्यावर औषधोपचार सुरूआहेत. वाद संपत्तीचा असला तरी वेडाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले.

अधिक माहिती अशी, नामवंत बिस्कीट कंपनीत सरव्यवस्थापक म्हणून नोकरी केलेले व उत्तरप्रदेशमधील शुगरकेन विभागात वरिष्ठ अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले अमरसिंह मारुती माने (वय ८०) हे पूर्वी मंगळवार पेठेत राहात होते. अलीकडे त्यांनी पाचगाव रोडवर आर.के.नगर येथील द्वारकानंद कॉलनीत दुमजली बंगला बांधला आहे. माने यांना दोन मुले. मोठा पृथ्वीराज (वय ४७) व लहान देवेंद्र (४०) पृथ्वीराजला दोन मुली आहेत. तर देवेंद्र अविवाहित आहे.

बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर पृथ्वीराज आपल्या कुटुंबीयासह राहतो. तर आई, वडील व लहान भाऊ देवेंद्र खालच्या मजल्यावर राहतात. मुलांनी एखादा चांगला उद्योग सुरू करावा, असे स्वप्न त्यांचे होते. त्यातून त्यांनी पृथ्वीराजला अनेक व्यवसाय सुरू करून दिले. विविध कंपन्यांच्या एजन्सी घेऊन दिल्या. मात्र, पृथ्वीराज हा उधळपट्टी करून व्यवसायाच्या आहारी गेला होता. त्यातून हे सर्व व्यवसाय बंद पडले. त्यानंतर घरात सुरू केलेले दुकानही बंद पाडले.

उद्योग-व्यवसाय नसल्याने खर्चाला पैसे नव्हते. त्याने वडिलांकडे सतत पैशाची मागणी, संपत्तीची वाटणी करून देण्यासाठी तगादा लावला होता. त्यातून त्यांच्यात वादावादी होत होती. दरम्यान, सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास संपत्तीच्या वाटणीच्या वादातून दोघांत जोरदार वादावादी झाली. यावेळी वैतागलेल्या वडिलांनी तुला पैसा काय, संपत्तीमधील दमडीही देणार नाही, असे सांगून टाकले. काही वेळाने वाद शांत झाल्यानंतर तो आपल्या रूममध्ये निघून गेला. तर वडील अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. त्यानंतर काही वेळाने पृथ्वीराज हातात सुरा घेऊन खाली आला.

धुण्यासाठी कपडे घेत असलेल्या आईचे त्याने पाठीमागून तोंड दाबून धरले. त्यानंतर सुरीने त्यांचा गळा चिरला. त्यानंतर पोट, छाती, कमरेवर सपासप आठ वार केले. यावेळी झटापटीत तोंडावरला हात निसटल्याने त्या किंचाळल्या. त्यांचा आवाज ऐकून वडील बाहेर पळत आले. तोपर्यंत हा पसार झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला पाहताच त्यांना धक्का बसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कारमधून सीपीआरमध्ये दाखल केले. या प्रकाराची माहिती समजताच पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी व सीपीआरमध्ये भेट दिली. त्यानंतर काही वेळेतच पसार झालेल्या मुलग्याला अटक केली.

वडिलांवरील राग आईवर

वडिलांसोबत रोज =होत असे. पैसे नाही, संपत्ती देण्यास विरोध करणाऱ्या वडिलांचा खूप राग आला होता. त्यांना संपविण्यासाठी वरती खोलीत गेलो. सुरा घेऊन खाली आलो, तर समोर आई होती. प्रत्येकवेळी वादावादीवेळी ती वडिलांची बाजू घेऊन मला दोष देत होती. ती समोर दिसल्याने वडिलांचा राग आईवर काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

वर्षापूर्वी मारहाण

पृथ्वीराजला आई-वडील सुधारण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, वडिलांची संपत्ती आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. तो व्यसनाच्या आहारी गेल्याने त्याच्या नावावर संपत्ती करण्याचे धाडस आई-वडील करीत नव्हते. वर्षापूर्वी त्याने याच वादातून आई-वडिलांना बेदम मारहाण केली होती. त्याच्या या त्रासाला कंटाळून वडिलांनी त्याच्या विरोधात करवीर पोलिसांत तक्रार दिली होती. घरचा वाद असल्याने पोलिसांनी समज देऊन त्याला सोडून दिले होते.