राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडे मोतीबाग तालमीतील मल्लांकरिता मॅटची मागणी करण्यात आली होती. त्याकरिता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रयत्नातून ही पाच लाख किमतीची मॅट मंजूर केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात ही मॅट डाॅ. साखरे यांच्या हस्ते तालमीस प्रदान करण्यात आली. संघाचे सरचिटणीस ॲड. महादेवराव आडगुळे यांनी प्रास्ताविक केले. हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी आभार मानले. यावेळी हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, अशोक माने, माजी महापौर मारुतीराव कातवरे, माणिक मंडलिक, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश खोत, विजय पाटील, विजय सरदार, रामा कोवाड, संतोष कामत, रणजित पाटील, दादू चौगुले (कनिष्ठ) वसंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मल्ल उपस्थित होते.
फोटो : ०७०१२०२१-कोल-मोतीबाग
ओळी : राज्य शासनाच्या क्रीडा विभागातर्फे मोतीबाग तालमीस जिल्हा क्रीडाधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे यांच्या हस्ते कुस्ती मॅट प्रदान करण्यात आली. यावेळी डावीकडून माणिक मंडलिक, मारुतीराव कातवरे, हिंदकेसरी दीनानाथसिंह, व्ही. बी. पाटील, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.