कृष्णा सावंत ।आजरा : राजकीय पक्षांच्या लेबलवर निवडणूक लढविणे अडचणीचे ठरत असल्याने राष्ट्रवादी वगळता बाकीच्या सर्व पक्षांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची स्थानिक आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.६ एप्रिलला मतदान आणि ७ एप्रिल रोजी निकाल असल्याने उमेदवारांना प्रचार करण्यास कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपची आघाडी होईल असे वाटत असतानाच अण्णा-भाऊ समूहाच्या पुढाकारातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची नवी स्थानिक आघाडी आकाराला येत आहे.आजऱ्यात मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असल्याने भाजपच्या बॅनरखाली निवडणूक लढविणे स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरत असल्यानेच भाजप, शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षातील एका गटाला सोबत घेऊन आघाडी करण्यात येत आहे. मात्र, या आघाडीत भाजपचे अशोक चराटी, जनार्दन टोपले, प्रा. सुधीर मुंज, विलास नाईक, अरुण देसाई, बापू टोपले, विजय पाटील या भाजपच्या मंडळींचेच वर्चस्व राहणार आहे.राष्ट्रवादीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या बॅनरखालीच निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँगे्रसची आघाडी होण्याची शक्यता असल्याने अण्णा-भाऊ समूहातील काही नाराज मंडळींना गळ लावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे.जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, बशीर खेडेकर, रशीद पठाण, कृष्णा पटेकर, अशोक पोवार, विक्रम देसाई, पांडुरंग मोहिते ही मंडळी कामाला लागली आहेत.सर्वपक्षीय स्थानिक आघाडीकडून विजय थोरवत, नाथा देसाई, बाळ केसरकर, संजय इंगळे, भास्कर बुरुड, परेश पोतदार, आनंदा कुंभार, संजीवनी सावंत, शुभदा जोशी, नयन भुसारी, दिनेश कुरुणकर, शशिकला चौगुले आदी ५० ते ६० जण इच्छुक आहेत.राष्ट्रवादी प्रणीत आघाडीकडून शिवसेनेचे संभाजी पाटील, विक्रम देसाई, रशीद पठाण, विजय पटेकर, उद्योजक महादेव पोवार, अशोक पाचवडेकर, अशोक पोवार आदी इच्छुकांची संख्या वाढत आहे.या निवडणुकीसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, संध्यादेवी कुपेकर, आमदार प्रकाश आबिटकर ही नेतेमंडळी लक्ष घालणार असल्याने ही निवडणूक रंगतदार होणारआहे.खेडेकर गट राष्ट्रवादीवर नाराजजि. प. व पं. स. निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत असलेले खेडेकर गटाचे प्रमुख आप्पा खेडेकर, माजी सरपंच अस्लम खेडेकर राष्ट्रवादीवर नाराज आहेत. राष्ट्रवादी या निवडणुकीत खेडेकर गटाचा विचार करत नसल्याने खेडेकर गट राष्ट्रवादीपासून दूर जात आहे.तिसºया आघाडीची शक्यताअण्णा-भाऊ प्रणीत आघाडी व राष्ट्रवादीप्रणीत आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढत आहे. दोन्ही आघाड्या सर्वच इच्छुकांना उमेदवारी देऊ शकत नाहीत. त्यामुळे तिसºया आघाडीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.