दुधाला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ पट्टणकोडोली येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चाबकाचे फटके व दुधाची आंघोळ घालून दराबाबत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष गुंडूराव मोरे यांनी दरवाढीचा निर्णय लवकर नाही घेतला तर भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या वेळी कल्लप्पा शिरोळे, सुधीर सुरवशी, महादेव कुडाळकर, सूरज माळी, सलीम सुळकुडे, मंगा पुजारी, उत्तम माने, प्रदीप मिरजकर, समीर जामदार, रावसो शेळके, सतीश नाईक, निखिल पाटील व इतर उपस्थित होते.
फोटो : १० पट्टणकोडोली आंदोलन
ओळ : दुधाला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चाबकाचे फटके व दुधाची आंघोळ घालून रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.