हुपरी : हुपरी (ता.हातकणंगले )शहरांतील माळभागावरील चार उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी वसाहतीतील खुल्या जागेमध्येच जलकुंभ उभारण्यात यावा. या मागणीसाठी शहर शिवसेनेने आज नगरपरिषद कार्यालयानजीकच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ही मागणी नगरपरिषद प्रशासनाने मान्य न केल्याने हुपरी शहर बंद पुकारुन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान काळंम्मावाडी वसाहतीतील जागा संपादित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे लेखी आश्वासन नगरपरिषद प्रशासनाने दिल्यानंतर दुपार नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन ग्रामपंचायत काळात मंजूर झालेली नळपाणी योजना अद्यापही दुसऱ्या टप्पा पूर्ण होण्याच्या प्रतिक्षेत आहे. योजनेच्या आराखड्यात शहरांतील विविध चार भागात जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी तिन जलकुंभ बांधून तयार आहेत.मात्र माळभागावरील चार वसाहतीना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारा काळम्मावाडी वसाहतीतील नियोजित जलकुंभ अद्याप पर्यंत उभारण्यात आलेला नाही. या जागेवर जलकुंभ उभारण्यास येथील नागरिकांनी विरोध केल्यामुळे गेली सात वर्षे हा जलकुंभ उभारण्यात आलेला नाही. या जलकुंभाची उभारणी त्वरीत करण्यात यावी अंशी मागणी करीत शिवसेना शहर प्रमुख अमोल देशपांडे ,विभाग प्रमुख विनायक वीभुते , संजय पाटील रघुनाथ नलवडे भरत मेथे गणेश कोळी अरुण गायकवाड नितीन काकडे अर्जुन जाधव तुळशीराम गजरे महेश कोरवी रणजित वाइगडे उषा चौगुले मीना जाधव सागर खोत विजय जाधव सचिन यादव यांनी अण्णाभाऊ साठे चौकातील जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले.
या आंदोलनांची दखल घेत उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे अमित गाठ यांनी आंदोलकाशी चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली याबाबत नगरपरिषद कोणतीही ठोस भूमिका घेत नाही.असे समजताच जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी हुपरी शहर बंद पुकारुन ठिया आंदोलन सुरू केले.शिवसैनिक शहरात फिरून बंद च्या घोषणा देत असल्याने व्यापा?्यांनी आपली दुकाने पटापट बंद केलीं .शहराकडे येणारी सर्व वाहतूक बंद झली त्यामुळे विविध प्रकारच्या अफवा पसरल्याने शहरांतील तणावात भरच़ पडली. यावेळी जादा पोलिस बंदोबस्त पाचारण करण्यात आला होता.
हुपरी शहरांतील चार वसाहतीना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाºया जलकुंभाची तातडीने उभारणी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने जलकुंभावर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. २)या मागणीच्या पूर्ततेसाठी नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले, ३)यावेळी शहरांत बंदही पुकारण्यात आला होता.