दरम्यान, राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याने झटापट झाली.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, शहराध्यक्ष संदीप पाटील यांनी केले. यावेळी संदीप दबडे, प्रमोद सुर्यवंशी, दीपक गुरव यांनी निषेधाची भाषणे केली.
यावेळी बबलू खाटिक, शशिकांत पाटील, सागर डोंगरे, अनिल सुतार, विशाल पाटील, प्रवीण पाटील, सागर साखळकर, हेमलता मुसळे,अनिता बुचडे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो कॅप्शन: पेठवडगाव : येथील नगरपालिका चौकात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने राणे यांच्या पुतळ्यासमोर संताप व्यक्त करताना शिवसेनेचे पदाधिकारी.