कोल्हापूर : रिक्त झालेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक तारीख निश्चित करून मिळावी, असे पत्र महापालिकेचे नगरसचिव सुनील बिद्रे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवले आहे.महापालिकेच्या संदीप कवाळे यांनी स्थायी समिती सभापती पदाचा सोमवारी (दि. १०) राजीनामा दिला. यानंतर महापालिका प्रशासनाकडून रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रिक्त झालेल्या जागेसंदर्भात मंगळवारी नगरसचिव सुनील बिद्रे यांनी पुणे विभागीय आयुक्त यांना पत्र पाठवले.
यामध्ये नवीन सभापती नियुक्ती करण्यासाठी निवडणुकीची तारीख आणि अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती व्हावी, असे यामध्ये म्हटले आहे. स्थायी समिती सभापतीसाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर शिक्षण समिती सभापती प्रभाग समिती सभापती आणि महापौर निवडीसाठी हालचाली सुरू होणार आहेत.निवडणूक कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर या पदासाठीच्या राजकीय हालचालींना सुरुवात होणार आहे. विरोधी भाजप ताराराणी आघाडीकडून अद्यापि हालचाली सुरू नाहीत. राष्ट्रवादीकडून निवडीच्या आदल्या दिवशी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.