इचलकरंजी : जिल्ह्यात विजयाची घोडदौड सुरू झाली. जिल्ह्यातील भाजपचे आम्ही सर्वजण एकत्र नियोजन करू त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत यापुढे चित्र बदललेले पाहायला मिळेल. जिल्ह्यातील नेत्यांना सध्या 'सर्व आमचंच' असा प्रकार सुरू आहे.आमदार, खासदार, नगरसेवक त्यांचेच त्यामुळे विकास कामे सोडून इतर सर्व कार्यक्रम अगदी व्यवस्थित सुरू आहेत. 'आमचं ठरलय' म्हणायचं आणि सगळं घ्यायचं एवढंच सुरू आहे. आता आमची मोठी टीम तयार झाली आहे. तीच आमची ताकद आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.इचलकरंजीतील कमिटीच्यावतीने कार्यक्रमात बेंदूर आयोजित माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते महाडिक यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार आवाडे यांनी, आता विजयाची सुरुवात झाली असून पुढील काळात सर्वच निवडणुकीत केवळ भाजपच दिसेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात बेंदूर सणानिमित्त तीन दिवसात आयोजित सर्व कार्यक्रमांतील विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि. प. सदस्य राहुल आवाडे, बाबासाहेब चौगुले, स्वप्निल आवाडे, शिवाशीष पाटील, बाबासाहेब पाटील, नरसिंग पारीक, बाळासाहेब कलागते, आदींसह प्रमुख पदाधिकारी व बेंदूर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Dhananjay Mahadik: 'आमचं ठरलय' म्हणत 'सगळं घ्यायचं' एवढंच सुरू, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 1:33 PM