शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड, धनंजय महाडिक यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:23 PM

स्वतः पंधरा वर्षे सत्तेमध्ये आणि आठ वर्षे मंत्री असताना, या महाशयांना इनडोअर स्टेडियम पूर्ण करावे, असे कधी वाटले नाही.

कोल्हापूर: प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठी मंजूर झालेला निधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाकबगार आहेत; पण आता इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता आला नाही, हे त्यांचे खरे दुःख आणि मळमळ आहे, असे प्रत्युत्तर खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकाव्दारे दिले आहे.महाडिक पत्रकात म्हणतात, विकासाच्या केवळ गप्पा मारायच्या आणि आपणच खेळाडूंचे तारणहार आहोत, असा देखावा निर्माण करणाऱ्या माजी पालकमंत्र्यांची भुलवणारी कार्यपद्धती सर्वांनाच माहीत आहे. खूनशी स्वभाव आणि राजकीय विद्वेषातून, या महाशयांनी आजवर अनेकांना धोका दिला आहे. म्हणूनच सूर्याजी पिसाळ ही त्यांना उपमा मिळाली. कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पेटलेलं असताना, स्वत: टोलची पावती फाडून, माजी पालकमंत्र्यांनी ढपला पाडल्याची जाहीर कबुलीच दिली. त्यांना कोल्हापूरची जनता कधीच माफ करणार नाही.स्वतः पंधरा वर्षे सत्तेमध्ये आणि आठ वर्षे मंत्री असताना, या महाशयांना इनडोअर स्टेडियम पूर्ण करावे, असे कधी वाटले नाही. वास्तविक ज्या इनडोअर स्टेडियमबद्दल माजी पालकमंत्री आता बोलत आहेत, त्याचा निधी सुमारे दीड वर्षांपूर्वी राज्य शासनाने मंजूर केला. मात्र दीड वर्षात कोणतेही काम झाले नसल्यानेच, हा निधी राज्य शासनाने खेळाडूंच्या अन्य विकास कामांसाठी वळवला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक