शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
3
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
4
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
5
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
6
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
7
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
8
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
9
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
10
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
11
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
12
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
13
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
14
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
15
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
16
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
17
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
18
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
19
Pitru Paksha 2024: घरातल्या भिंतीवर पूर्वजांच्या लावलेल्या तसबीरींची दिशा तपासून बघा; वास्तुदोष टाळा!
20
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Kolhapur Politics: समरजित घाटगे यांच्याविरोधात भाषण करणार?, धनंजय महाडिक म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 2:50 PM

के.पी.सह शिवाजी पाटील, हाळवणकर यांच्यापुढे पेच..

कोल्हापूर: महाडिक आता कोंडी करून घेणार नाहीत. आम्ही भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहोत. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल त्याचे तंतोतंत पालन केले जाईल, अशी भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. कागलमध्ये कालपर्यंत तुमच्यासोबत असलेल्या समरजित घाटगे यांच्याविरोधात कागलमध्ये जाऊन भाषण करताना तुमची कोंडी होणार नाही का, या प्रश्नावर महाडिक यांनी हे उत्तर दिले.कागलमधील बदलत्या राजकीय स्थितीवर बोलताना ते म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघात गेली १० वर्षे घाटगे हे काम करत आहेत. जेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत सत्तेत सहभागी झाली तेव्हाच हसन मुश्रीफ हेच उमेदवार हे निश्चित झाले. त्यामुळे घाटगे यांना आम्ही विनंती केल्यानंतरही त्यांनी काही वेगळा निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. आमचे तिन्ही ताकदीचे पक्ष एकत्र आल्यामुळे राज्यात काही ठिकाणी ज्यांना संधी मिळणार नाही, असे नेते वेगळा विचार करण्याची शक्यता आहे परंतु महायुती एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

के.पी.सह शिवाजी पाटील, हाळवणकर यांच्यापुढे पेच..जिल्ह्याचा विचार करता अजून माजी आमदार के. पी. पाटील सोडून गेलेत असे म्हणता येणार नाही. चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांचा प्रश्न आहे. इचलकरंजीत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा मुद्दा आहे परंतु याबाबत ज्या काही गोष्टी व्हायच्या आहेत. त्या वरिष्ठ पातळीवर स्पष्ट केल्या जातील.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शहरात इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे नियोजन होते. बसेस तयारही आहेत. जादा दहा, पंधरा मिळण्याचीही शक्यता आहे परंतु जोपर्यंत चार्जिंग स्टेशनचे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत या बसेस आणून उपयोग होणार नाही. ‘वंदे भारत’ऐवजी केंद्र सरकारने सध्या नियमित रेल्वे बोगी बांधणीला प्राधान्य दिल्याने ‘वंदे भारत’ला थोडा विलंब होईल, असेही महाडिक यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस