कोल्हापूर : कित्येक वर्षांनी काँग्रेसला एवढी चांगली संधी आली आहे, तर तुमच्या गळ्यात पडणारी माळ दुसऱ्याच्या गळ्यात कशाला घालता? तुमच्यात दम असेल तर तुम्ही का लढत नाही, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांना बुधवारी दिले.खासदार महाडिक यांनी पुईखडी येथे थेट पाइपलाइन योजनेची माहिती घेतल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रतिक्रियेवर त्यांनी हे आव्हान दिले.२५ ते ३० वर्षांनंतर कोल्हापूरमधून काँग्रेसला संधी मिळाली आहे. काँग्रेसला जागा मागून घेणे एक षडयंत्र असून त्यामागे कोण आहे जनतेला माहिती आहे. बाजीराव खाडे गांधी परिवाराच्या जवळची व्यक्ती गेली चार वर्षे तयारी करीत आहे. चेतन नरके उमेदवारी मागत आहेत. त्यांना डावलून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा निर्णय होत आहे. येथील नेत्याने आपल्या गळ्यातील माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला आहे.डावपेच करून, लोकांना भावनिक आवाहन करून आमचं ठरलंय म्हणत निवडणूक लढवायची हे आता लोकांना कळलंय. हा नेता कसा फसवा आहे, लोकांची दिशाभूल कसा करतोय हे माहिती झालं आहे. त्यामुळे त्यांनी काय ठरविलंय ते तुम्हाला लवकरच कळेल.ते तर 'शब्द' पलटणारे नेते शब्द पलटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. चांगले शब्द त्यांच्या तोंडून कधी बाहेर पडत नाहीत. खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची, वैयक्तिक टीका करायची? चारित्र्यहनन करायचे हा त्यांचा एक दुर्गुण आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी ते, त्यांचे बंधू देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन मला बिनिवरोध करा, मी राजाराम कारखान्याची निवडणूक लढविणार नाही, असा शब्द दिला होता. त्यावेळी विनय कोरे तेथे होते. नंतर निवडणूक लढले. त्यामुळे शब्द पलटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. ‘आयआरबी’च्या रस्त्यांना सगळ्यांचा विरोध असताना त्यांनी टोलची पावती भरली होती, असेही महाडिक म्हणाले.
तुमच्यात दम असेल तर मग का लढत नाही?, खासदार महाडिक यांचे सतेज पाटील यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 11:55 AM