शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

महाडिकांच्या गुगलीने महाविकास आघाडीचे नेते सावध, पक्षातील नाराजांवर लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 6:15 PM

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इनकमिंग सुरू होणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर केले. महाडिक यांच्या या गुगलीने महाविकास आघाडीचे नेते सावध झाले असून, आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता, दुसऱ्या फळीतील काठावरील नेतेच उड्या मारणार आहेत, गडहिंग्लज उपविभागातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कारखान्यांचे माजी संचालकांची नावे चर्चेत आहेत.निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचा धडाका सुरू होतो. सत्ता पाहून अनेक जण इकडून तिकडे उड्या मारत असतात. राज्यात २०१४ला भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये इतकी गर्दी झाली की आता प्रवेश नको, म्हणण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली होती. २०१९ला राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाले आणि भाजपमध्ये गेलेल्यांची गोची झाली. त्यांचा महाविकास आघाडीचा संपर्क वाढू लागला, तोपर्यंत पुन्हा सत्तांतर झाले आणि भाजपचे सरकार आले.

जिल्ह्यात आगामी काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इनकमिंग सुरू होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित जिल्ह्यातील दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची गुगली टाकली. यामुळे महाविकास आघाडीचे नेते सावध झाले आहेत.माजी आमदारांचा प्रवेश अशक्यचजिल्ह्यात सध्या विधानसभा व विधान परिषदेचे १९ माजी आमदार आहेत. त्यापैकी ५ भाजप, चार राष्ट्रवादी, पाच शिवसेना (ठाकरे गट), दोन काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शेकाप व जनता दल प्रत्येकी एक अशी संख्या आहे. दोन्ही काँग्रेसमधील माजी आमदारांपैकी कोणी भाजपच्या गळाला लागेल, अशी सध्या तरी स्थिती नाही.

खरच पक्षाची ताकद वाढली का?भाजपमध्ये २०१४ पासून अनेक ताकदवान नेत्यांनी प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक हे वगळता इतरांचा पक्ष वाढीसाठी फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आणखी भरती करून खरच पक्षाची ताकद वाढणार की सत्तेची सूज तयार होणार? असा सवाल निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी