शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

रायगडावरील राजसदरेवर शिवभक्तांना प्रवेश, खासदार संभाजीराजे यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 9:50 AM

Raigad Sambhaji Raje Chhatrapati - पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रायगड येथील राजसदरेवर शिवभक्तांना प्रवेश खुला करण्याचा तत्काळ निर्णय रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी घेतला. त्यांनी रायगड किल्ल्यास भेट दिली.

ठळक मुद्देरायगडावरील राजसदरेवर शिवभक्तांना प्रवेश, खासदार संभाजीराजे यांचा निर्णय एप्रिलअखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याची अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रायगड येथील राजसदरेवर शिवभक्तांना प्रवेश खुला करण्याचा तत्काळ निर्णय रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी घेतला. त्यांनी रायगड किल्ल्यास भेट दिली.रोपवे अप्पर स्टेशन ते होळीचा माळ या फरसबंद मार्गाची पाहणी केल्यानंतर हत्ती खान्याजवळ प्राधिकरणाचे कंत्राटदार, अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी, महावितरण, बांधकाम विभाग आणि एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खासदार संभाजीराजे यांनी कामांची माहिती घेतली. सध्या सुरू असलेली कामे एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर या सदरेवरील बॅरिकेड्‌सचा विषय चर्चेस आला. त्यावर उपस्थित पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ निर्णय घेत सदरेवरील बॅरिकेडस् हटवून शिवभक्तांना राजसदरेवर प्रवेश खुला केला. त्यावर उपस्थित शिवभक्तांनी जयघोष केला. गडावर प्राधिकरण व पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला होत असलेल्या उत्खनन जागांची खासदार संभाजीराजे यांनी माहिती घेतली. जगदीश्वर मंदिर फरसबंदीची, भूमिगत इलेक्ट्रिकल केबलचे काम, हत्ती तलाव, पायरीमार्ग कामाची पाहणी केली.राजसदरेवर येताना शिष्टाचार पाळाशिवभक्तांनी राजसदरेवर येताना शिष्टाचाराचे पालन करावे. या सदरेवर डाव्या बाजूने यावे आणि उजवीकडून उतरावे. तख्ताच्या जागेवर जाऊ नये. सेल्फी घेऊ नये. शांतता पाळावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले. तूर्तास हे बॅरिकेड्‌स् तख्ताच्या बाजूने लावले असून लवकरच याऐवजी ऐतिहासिक धाटणीची संरचना करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :RaigadरायगडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर