कोल्हापूर : कोल्हापुरातील नर्सरी बागेमधील मराठा समाजाचे मूक आंदोलन आचारसंहितेत झाले. समाज बोलला आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधीने बोलावे या मराठा समाजाच्या घोषवाक्य प्रमाणे या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह दोन खासदार व सर्व आमदारांनी आपली भूमिका मांडून मराठा समाजासोबत असल्याची ग्वाही दिली.
पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी राज्य शासनाच्यावतीने मराठा समाजाचे नेते खासदार संभाजीराजे यांना उद्या गुरुवारी मुंबईमध्ये चर्चेला येण्याचे आमंत्रण दिले आहे.मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे.ज्या ऐतिहासिक नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळास मध्ये हे आंदोलन झाले.त्या समाधी स्मारकाच्या परिसरामध्ये चारी बाजूने भगवे ध्वज उभारण्यात आले आहेत.मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अंगामध्ये काळे टी-शर्ट काळे सदरे हातामध्ये काळ यापैकी व डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेले आहेत एकंदरीत आजचे हे आंदोलन अतिशय शिस्तबद्ध सुशांत झालेला आहे तिथे या ठिकाणी ज्या गोष्टी दिल्या जात आहेत त्या छत्रपती शाहू महाराज की जय एवढ्या एकाच प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत अन्य कुठलीही घोषणा दिली जात नाही.