शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

संभाजीराजेंना मुदतवाढ की त्यांचा अन्य पक्षात प्रवेश? खासदारकीची मुदत जूनपर्यंत; पुढील राजकीय दिशा काय..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 10:58 AM

मराठा आरक्षणाचा विषय व मराठा समाजात त्यांच्याबद्दल क्रेझ असल्याने दोन्ही काँग्रेस त्यांच्या बऱ्यापैकी संपर्कात असून, ते स्वत:ही या पक्षांच्या गुडबुकमध्ये

विश्वास पाटील

कोल्हापूर : राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत येत्या जूनमध्ये संपत आहे. भाजप त्यांना पुन्हा याच पदावर संधी देण्याची शक्यता फारच धूसर आहे. मराठा आरक्षणाचा विषय व मराठा समाजात त्यांच्याबद्दल क्रेझ असल्याने दोन्ही काँग्रेस त्यांच्या बऱ्यापैकी संपर्कात असून, ते स्वत:ही या पक्षांच्या गुडबुकमध्ये आहेत. त्यांची यापुढील राजकीय वाटचाल पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबतच व्हावी, असा छत्रपती घराण्याचाही आग्रह आहे.

संभाजीराजे यांची ११ जून २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी खासदार म्हणून नियुक्ती केली. केंद्रातील भाजप सरकारने त्यांना हा बहुमान दिला. थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांच्या लोकप्रियतेचा पक्षाच्या विस्तारासाठी उपयोग होईल, असा विचार करून त्यांना खासदार केले.परंतु, संभाजीराजे हे कधीच भाजपच्या पक्षीय चौकटीत अडकले नाहीत. आपल्याला मिळालेली खासदारकी ही भाजप सरकारने दिली हे मान्य करूनही तो शाहू घराण्याचा सन्मान म्हणून दिली असल्याची त्यांची भूमिका राहिली. त्यामुळे ते कधीच भाजपचे मांडलिक झाले नाहीत. कोणत्याही निवडणुकीत ते भाजपला मते द्या म्हणून सांगायला गेले नाहीत. मागील सहा वर्षांत तसे ते प्रमुख चार पक्षांसोबत समान अंतर ठेवून राजकीय व्यवहार करत आले आहेत.

खासदार म्हणून रायगडसह राज्यभरातील गडकोट किल्ल्यांच्या संरक्षण व संवर्धनावर ते सक्रिय राहिले. मराठा आरक्षण प्रश्नावर कितीही वाद-प्रतिवाद असले तरी बहुतांशी समाज ज्यांच्या नेतृत्वावर आजही विश्वास ठेवू शकेल, असे नेतृत्व म्हणून त्यांचेच नाव पुढे येते. त्यांना पुढे करून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला हादरे देण्याचा प्रयत्न मध्यंतरी भाजपकडून जरुर झाला.परंतु, त्याला संभाजीराजे बळी पडले नाहीत. मराठा आरक्षणासह सारथीचे प्रश्नही अजून जैसे थे आहेत. राज्य सरकारने त्यांना दिलेली कमिटमेंटही पाळलेली नाही. त्यामुळे हे प्रश्न घेऊन त्यांनाही रस्त्यावर उतरावे लागणारच आहे.

पुढील राजकीय दिशा काय...

संभाजीराजे यांच्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर पुढे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेवर जाऊ शकतात. परंतु, तूर्त राज्यसभेच्या जागा रिक्त झालेल्या नाहीत. विदर्भ-मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्रातही लोकबळ असलेला त्यांच्यासारखा नेता पक्षासोबत असावा, असे मुख्यत: राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाही वाटते.

पर्याय असेही...

- पाच राज्यांतील निवडणुकीनंतर देशाच्या व राज्याच्या राजकारणातही काही उलथापालथी होणार आहेत. महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष कोणते सूत्र घेऊन लोकसभेला सामोरे जाणार, याबद्दलही सर्वच अनिश्चितता आहे.- समजा काही वेगळे घडलेच तर ते कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून दोन्ही काँग्रेसचे उमेदवारही ठरू शकतात. परंतु, या घडामोडी आजतरी जर-तरच्या टप्प्यावर आहेत. महाविकास आघाडी एकत्रित सामोरे गेली तर त्यांना या पक्षाकडूनही राज्यसभेवर संधी मिळू शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती