शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

लोकसभेचे गणित पाहून संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे बंड; कोल्हापूकरकरांच्या पचनी पडणार?

By राजाराम लोंढे | Published: July 18, 2022 6:20 PM

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात पहिल्यांदाच मंडलिक व माने यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकला. या विजयाला काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत झाली हेही विसरता येणार नाही

राजाराम लोंढेकोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कमकुवत झालेली शिवसेना, त्यामुळे ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघातील बदललेली समीकरणे, देश पातळीवर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असलेली ‘क्रेझ’ व जिल्ह्यात दोन्ही कॉंग्रेसच्या ताकदीचा अंदाज घेऊन खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी बंडाचे निशाण हातात घेतले आहे. हे जरी खरे असले तरी राजकीय बंड कोल्हापूरच्या जनतेला फारसे पचनी पडत नसल्याचा इतिहासही आहे. त्यामुळे हे बंड यशस्वी होईल की नाही, हा येणारा काळच सांगेल.तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात पहिल्यांदाच मंडलिक व माने यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकला. या विजयाला काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत झाली हेही विसरता येणार नाही. गेल्या अडीच वर्षांत राज्यात महाविकास आघाडीबाबत कुरबुरी असल्या तरी कोल्हापुरात मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकदिलाने कारभार करत असल्याचे दिसले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे कोल्हापुरात फारसे हादरे बसायचे नाहीत, असेच वाटत होते.मात्र आमदार प्रकाश आबीटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर व राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. या कालावधीत संजय मंडलिक, धैर्यशील माने, चंद्रदीप नरके यांनी सावधच भूमिका घेतली. आता मंडलिक व माने यांनी उध्दव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ केल्याने शिवसेनेला जोरात धक्का बसला असला तरी हे बंड कोल्हापूरकरांच्या पचनी किती पडणार, यावरच फलित अवलंबून आहे.

सरुडकर, उल्हास पाटील का थांबले...?शिवसेनेच्या सहा माजी आमदारांपैकी राजेश क्षीरसागर हे उघड शिंदे गटात गेले. चंद्रदीप नरके हेही त्यांच्याच वाटेवर आहेत. डॉ. सुजित मिणचेकर हे शिवसेनेच्या बैठकीला येतात. संजय घाटगे यांचे अद्याप तळ्यात-मळ्यात आहे. सत्यजित पाटील-सरुडकर यांचे विरोधक आमदार विनय कोरे हे भाजपसोबत, तर उल्हास पाटील यांचे विरोधक राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटासोबत असल्याने त्यांना मूळ शिवसेनेसोबत राहण्याशिवाय पर्याय नाही.

हातकणंगलेचे गणित दिसते तितके सोपे नाहीपेठ वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे व विनय कोरे यांनी मोट बांधली आहे. जिल्हा बँकेत तर ही मोट अधिक घट्ट झाली. या तीन नेत्यांच्या जोडीला राजेंद्र पाटील-यड्रावकर असले तर हातकणंगले लोकसभेचे गणित सोडवणे अधिक सोपे जाईल, असे धैर्यशील माने यांना वाटत असले तरी हे गणित सोडवणे तितकेसे सोपेही नाही.

‘कोल्हापुरातून’ संजयबाबा की ‘के. पी.’संजय मंडलिक यांनी जय महाराष्ट्र केल्याने ‘कोल्हापूर’मधून कोण, असा प्रश्न आहे. महाविकास आघाडी अशीच एकसंध राहिली तर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे नाव पुढे येऊ शकते. कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचे सख्य चांगले आहे. त्यात घाटगे यांचे इतर पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्याशिवाय माजी आमदार के. पी. पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. ‘बिद्री’ साखर कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. या कारखान्याचा प्रभाव कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांवर पडतो.

धैर्यशील यांच्या विरोधात शेट्टीच

हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांनी बंड केल्याने महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी सध्यातरी चेहरा दिसत नाही. राजू शेट्टी यांनी आघाडीशी फारकत घेतली आहे. मात्र, ऐनवेळी माने यांना रोखण्यासाठी शेट्टींना पाठिंबा देऊ शकतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे