शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

'एमपीएससी'च्या टंकलेखन चाचणीचा घोळ अजूनही कायम

By संदीप आडनाईक | Published: August 28, 2023 2:16 PM

४०९ उमेदवारांचे गौडबंगाल

संदीप आडनाईककोल्हापूर : एमपीएससीने घेतलेल्या मंत्रालयीन लिपिक आणि कर सहायक पदाच्या २०२१साठी घेतलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणी निकालाचा घोळ अजूनही कायम आहे. आयोगाने १५० पदे रिक्त ठेवली आणि ३५० मुलांना अपात्र ठरविले. ‘लोकमत’ने याला वाच्यता फोडल्यानंतर पहिली अधिसूचना असतानाही पुन्हा दोन अधिसूचना काढल्या आणि परत पहिल्यानुसार निकाल जाहीर केला. अजूनही या निकालाचे कवित्व संपेना. दोषपूर्ण निकालानंतर रिस्पॉन्स शीटवरून आता उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्याचे स्पष्ट दिसत असल्याने उमेदवार आणि पालक संतप्त झाले आहेत. आयोगाने ही चाचणी दोषविरहित पद्धतीने पुन्हा घेऊन सुधारित निकाल लावावा, अशी मागणी होत आहे.एमपीएससीने मंत्रालयीन लिपिक आणि कर सहायक या पदांसाठी २०२१ पासून पहिल्यांदाच टंकलेखन पात्रता स्वरूपाची कौशल्य चाचणी घेतली. ७ एप्रिलच्या पहिल्या चाचणीत तांत्रिक अडचणी आल्याने ३१ मे रोजी पुन्हा घेतली. त्यातही तांत्रिक अडचणी आल्याने आणि पहिल्या अधिसूचनेनुसार परीक्षा न घेतल्याने उमेदवारांनी आक्षेप नोंदविला तरीही आयोगाने १२ जुलैला निकाल जाहीर केला. त्यात १५० जागा रिक्त ठेवल्या. यावरही अनेकांनी आक्षेप घेतल्याने ‘लोकमत’ने याचा पाठपुरावा केला.त्यावर आयोगाने खुलासा देऊन निकालानंतर २० जुलैला निकष जाहीर केले आणि आता २६ जुलैला विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात त्यांनी टाइप केलेली रिस्पॉन्स शीट पाठविली आहे. या सूचीवरून अनेक विद्यार्थ्यांचा उतारा टाइप करताना चुकलेल्या शब्दांची संख्या आणि आयोगाने दिलेली चुकीच्या शब्दांची संख्या त्यात बरीच तफावत असल्याचे आढळत आहे.

अनेक पात्र विद्यार्थी अपात्रकाही विद्यार्थ्यांनी २५१ शब्द टाइप करून त्यातील ४ शब्द चुकीचे असताना एमपीएससीच्या सूचित १८९ शब्द चुकीचे आणि ६२ बरोबर असल्याने त्याला अपात्र ठरवले. ही पात्रता २१२ अचूक शब्द अशी ठरवली. असाच अन्याय अनेक विद्यार्थ्यांवर झाला आहे. त्यामुळे पात्र असणारे अनेक विद्यार्थी अपात्र झाले आहेत.

४०९ उमेदवारांचे गौडबंगालएकूण पात्र २,११५ उमेदवारांच्या यादीत पात्रतेसाठी आवश्यक २३६ शब्द टाइप केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४०९ आहे. या सर्वांना पात्र ठरवले आहे. २३५ शब्द टाइप केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ आणि २३७ शब्द टाइप केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त ९ आहे. हा योगायोग आहे की, या विसंगतीमागे उत्तरपत्रिका तपासणीत काही गौडबंगाल आहे, हे शोधावे लागणार आहे.

असे आहेत ‘शब्द’२३०-२९, २३१-२२, २३२-१९, २३३-१६, २३४-२४, २३५-१९, २३६-४०९, २३७-९, २३८-५, २३९-९, २४०-५ असे एकूण ५६८ उमेदवारांच्या शब्दाची आकडेवारी तक्रारदार उमेदवारांनी जाहीर केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षाtypewriterटाइपरायटर