शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

ग्राहकाच्या शोले स्टाईल आंदोलनाने महावितरणला फुटला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 7:44 PM

mahavitaran Kolhapur- तोडलेले वीज कनेक्शन पुर्ववत करण्यासाठी ग्राहकाने शोले स्टाईलने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवली.

ठळक मुद्देग्राहकाच्या शोले स्टाईल आंदोलनाने महावितरणला फुटला घाम कनेक्शन तोडल्याने चौथ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न

कोल्हापूर: तोडलेले वीज कनेक्शन पुर्ववत करण्यासाठी ग्राहकाने शोले स्टाईलने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवली.

शनिवारी दुपारी सावित्रीबाई फुले हॉस्पीटलनजीकच्या महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्राच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न अग्नीशमनच्या जवानांनी हाणून पाडल्याने पुढचा अनर्थ टळला. तोडलेले कनेक्शन जोडल्याचे महावितरणने सांगितल्यानंतर हा इसम इमारतीवरुन खाली उतरला आणि दीड तासाच्या शोले नाट्यावर पडदा पडला.संभाजीनगरातील हा ग्राहक रिक्षा व्यावसायिक आहे. एप्रिलपासून एकही बिल न भरल्याने नियमाप्रमाणे महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली होती. तरीही भरणा न झाल्याने शनिवारी घरातील वीजेचे कनेक्शन तोडण्यात आले.

यावरुन संतापलेल्या या ग्राहकाने सावित्रीबाई फुले हॉस्पीटल येथील महावितरणचे कार्यालय गाठले, पण शनिवार अर्धा दिवसच कामाचा असल्याने दुपारी सर्व अधिकारी, कर्मचारी घरी निघून गेले. घरातील वीज तुटल्याने आधीच संतापलेल्या या ग्राहकाने थेट या इमारतीचा चौथा मजला गाठला आणि तेथून माझी नोकरी गेली आहे, मी बिल कसे भरु , थोडी मुदत द्या असे ओरडून सांगू लागला. अचानक आरडाओरड सुरु झाल्याने लोकही जमले. यामुळे अधिकच चेव चढलेल्या या ग्राहकाने थेट इमारतीवरुन उडी मारण्याचा इशारा जोरजोरात देण्यास सुरुवात केली.ही घटना कळल्यावर महावितरणचे अधिकारी धावत आले. लगेच अग्नीशमक यंत्रणेलाही पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो ग्राहक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, अखेर घरात वीज जोडल्याचे फोनवरुन खात्री करुन घेतल्यानंतरच तो इसम इमारतीवरुन खाली आला.

दीड तास सुरु असलेल्या नाट्यामुळे मात्र अधिकाऱ्यांना घाम फुटला तरी उपस्थितांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. दरम्यान वीज वापरली आहे, तर त्याचे बिल भरणे ही नैतिक जबाबदारी असताना ते न करता यंत्रणेला वेठीस धरण्याच्या या प्रकारावर उपस्थितांपैकी अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर