मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात महावितरण कंपनीची वीजबिलाची थकीत रक्कम तीन कोटी ३२ लाख सात हजार ७५० रुपये झाली आहे. तालुक्यातील नागरिकांनी वेळेवर वीजबिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन शाहूवाडी उपविभागाचे कार्यकारी अभियंता अभय शामराज यांनी केले आहे. दोन वर्षे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे नोकरी, व्यवसाय बंद आहेत. संपूर्ण लॉकडाऊनमुळे नागरिकांना बाहेर पडता आले नव्हते. त्यामुळे अनेकांना घरगुती, व्यावसायिक वीजबिल भरता आलेले नाही. परिणामी वीजबिलांची थकबाकी वाढली आहे. तालुक्यातील विभागवार थकलेली वीजबिलाची रक्कम पुढीलप्रमाणे- मलकापूर- ५९ लाख ५६ हजार, बांबवडे - एक कोटी १६ लाख, वारूळ - ४० लाख , सरुड- १७ लाख, भेडसगाव- ३० लाख, कापशी - १३ लाख, शाहूवाडी ६६ लाख अशी तीन कोटी ३२ लाख सात हजार ७५० एवढी रक्कम थकलेली आहे.
शाहूवाडीत महावितरणची तीन कोटी ३२ लाखांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:28 AM