सडोली (खालसा) : कोरोना काळातील घरगुती वीज ग्राहक व शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली आहे. ऊर्जामंत्री व महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जाविषयक धोरणाच्या विरोधात करवीर तालुका भाजपच्यावतीने कोथळी (ता. करवीर) येथे महावितरण उपकेंद्रास टाळे ठोकून ऊर्जामंत्री व महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा दिल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील म्हणाले, कोरोना काळामध्ये वीज बिलमाफी करण्याचे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते, पण त्यांनी तो शब्द फिरवला आहे. कोरोना काळातील वीज बिले माफ केल्याशिवाय भाजप पक्ष गप्प बसणार नाही.
यावेळी तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील- हळदीकर, बी. वाय. लांबोरे, आनंदराव चौगले, दिनकर पाटील, राजाराम चौगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
०६ सडोली खालसा भाजप आंदोलन
कोरोना काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी करवीर तालुका भाजप पक्षाच्यावतीने कोथळी (ता.करवीर) येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.