कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत असून, अशा रुग्णांचा त्वरित शोध घेऊन या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने म्युकरमायकोसिस संशयितांची विशेष शोधमोहीम सुरू केली आहे. शहरात मे २०२१ पासून आतापर्यंत जे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्या माध्यमातून ही शोधमोहीम केली जाणार आहे.
कोरोना रुग्णासोबत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने या आजाराने लवकर निदान होऊन संबंधितांवर वेळीच उपचार करणे तसेच रूग्णांमधील गंभीर आजार होण्यापूर्वीच शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी शहरात म्युकरमायकोसिसचे संशयित रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेने दि. २८ मे ते २ जूनपर्यंत शहरातील आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांचा सर्वेक्षण होणार आहे. या मोहिमेसाठी नोडल ऑफिसर म्हणून सहायक आयुक्त संदीप घार्गे आणि प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव यांची नियुक्त केली आहे.
-तपासणी कोणाची होणार?
शहरामध्ये दि. १ मेपासून आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह येऊन उपचार घेऊन डिस्चार्ज घेतलेले, कोरोनाचा सध्या उपचार घेत असलेले ॲक्टिव्ह रुग्ण, मथुमोह रूग्ण, प्रतिकारशक्ती कमी असणारे रूग्ण याची तपासणी केली जाणार आहे.