शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
3
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
4
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
5
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
6
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
7
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
8
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
9
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
10
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
11
रतन टाटांनी मान्य केली होती नॅनोतील 'ती' चूक; ट्रकमधून बंगालवरुन गुजरातला हलवला प्रकल्प
12
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
13
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
14
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
15
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
16
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
17
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
18
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
19
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
20
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज

By संदीप आडनाईक | Published: September 18, 2023 4:43 PM

संदीप आडनाईक कोल्हापूर : सिंचनासाठी दिवसा वीज मिळण्यासाठी महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू ...

संदीप आडनाईककोल्हापूर : सिंचनासाठी दिवसा वीज मिळण्यासाठी महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘अभियान २०२५’ अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामुळे १ लाख २४ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा विजेची सोय होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६१ आणि सांगली जिल्ह्यातील ९३ उपकेंद्र प्रतीक्षेत आहेत. सध्या सिंचनासाठी रात्री वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सौर कृषी वाहिनीमुळे त्यांना दिलासा मिळेल.

शेतीला दिवसा, अखंडित व शाश्वत वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राचा वीज भार असणाऱ्या वीजवाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे. ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या ठिकाणी ५ ते १० किलोमीटर परिघातील गायरान, नापीक व पडीक जमिनीवर ०.५ ते २५ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौरप्रकल्प उभारण्यात येतील. -परेश भागवत, मुख्य अभियंता, कोल्हापूर परिमंडळ, महावितरण. 

सौर प्रकल्पासाठी शासकीय जमीन एक रुपये इतक्या नाममात्र दराने भाडेपट्टा तसेच पोटभाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळाली आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प कार्यान्वित झाला असेल, त्यांना तीन वर्षांसाठी ५ लाख रुपये प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत देण्यात येणार आहे. -अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता, कोल्हापूर, महावितरण.

इथे होतील सौरऊर्जा प्रकल्पकोल्हापूर जिल्हा

  • ४३ उपकेंद्र
  • ७९५ एकर जमीन
  • १५९ मेगावॅट क्षमता
  • ६५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज.

सांगली जिल्हा

  • २८ उपकेंद्र
  • ११५३ एकर जमीन
  • १८६ मेगावॅट क्षमता
  • ५९ हजार शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

कोल्हापूर जिल्ह्यातील योजनेत समाविष्ट उपकेंद्र आणि गावेकरवीर : कोगे (बहिरेश्वर), बालिंगा (आडूर),गगनवाबडा : गगनबावडा (गगनबावडा), मार्गेवाडी-निवडे (म्हाळुंगे)पन्हाळा : पडळ (माजगाव), बाजारभोगाव (पिसात्रे), सातवे (सावर्डे तर्फे सातवे), वेतवडे (हारपवडे), पाटपन्हाळा (पाटपन्हाळा), कळे (परखंदळे)शाहूवाडी : शाहूवाडी (कोळगाव), सरुड (सरुड), वारुळ (वारुळ), मांजरे (मांजरे).कागल : सिद्धनेर्ली (बामणी), सोनगे (बानगे व कुरुकली), केनवडे (केनवडे),भुदरगड : पिंपळगाव (बामणे), कडगाव (तिरवडे), तांबाळे (अनफ बुद्रुक), शेलोली (शेलोली)हातकणंगले : चोकाक (हेर्ले), हातकणंगले (आळते), कुंभोज (नेज), हुपरी (रेंदाळ), किणी वाठार (किणी व वाठारतर्फे वडगाव).शिरोळ : कोथळी (कोथळी), अब्दुललाट (लाट), कोंडिग्रे (हरोली)राधानगरी : सोळांकुर (नरतवडे),चंदगड : चंदगड (काजिर्णे व चुर्णीचा वाडा), कोवाड (कोवाड), हलकर्णी (डुक्करवाडी), हलकर्णी एमआयडीसी (जंगमहट्टी), पार्ले (पार्ले), माणगाव (माणगाव), अडकूर (आमरोली व उत्साळी)गडहिंग्लज : नेसरी (सांबरे व तावरेडी), महागाव (हरळी बुद्रुक), गडहिंग्लज एमआयडीसी (शेंद्री), हेब्बाळ-कसबा नुल (हनिमनाळ व हासुरचंपू)आजरा : उत्तुर (मुमेवाडी व उत्तुर), गवसे (हारपवडे)

सांगली जिल्ह्यातील योजनेत समाविष्ट उपकेंद्र आणि गावेखानापूर-विटा : खानापूर (बेनापूर व रेणावी), लेंगरे (रेणावी), गार्डी (भाग्यनगर-भाकुचीवाडी), पारे (रेणावी), रेणावी (रेणावी)जत : संख (आसंगी), शेगाव (कोसारी), उमदी (हळ्ळी), तिकोंडी (कोंत्याव बोबलाद व तिकोंडी), पाचापूर (शेड्याळ), धावडवाडी (बेवनूर व बिरनाळ), जिरग्याळ (जिरग्याळ), बसर्गी (बसर्गी), उटगी (बेलोंडगी), तासगाव : सावळज (खुजगाव), मणेराजुरी (गवाण), वायफळे (मोरळेपेड), कौलगे (खुजगाव), मांजर्डे (गौरगाव).आटपाडी : खरसुंडी (घाणंद), लिंगीवरे (पळसखेड व लिंगीवरे), पुजारवाडी (पळसखेड),कवठेमहांकाळ : बोरगाव (मळणगाव), ढालगाव (चुडेखिंडी), करोली (कोगनोळी), केरेवाडी (केरेवाडी), कडेगाव : वांगी (तडसर), शिरसगाव (शिरसगाव)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज