लोकमत न्यूज नेटवर्क
रुकडी माणगाव : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्यावर मराठा आरक्षण संबंधित करण्यात येत असलेले बेछूट आरोप व त्यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य म्हणजे मराठा समाजाच्या अपमान आहे, असे संतप्त प्रतिक्रिया मराठा महासंघाचे जिल्हा संघटक मिलिंद ढवळे पाटील यांनी दिले. ते उपाध्यक्ष मुळीक यांच्यावर आक्षेपजनक केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुका मराठा महासंघाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलत होते.
कोल्हापूर येथे दि. २४ रोजी झालेल्या बैठकीत एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने उपाध्यक्ष वसंतराव मुळीक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याविषयी अनुद्गार काढले होते. या अनुद्गारांचा खरपूस समाचार या बैठकीत घेण्यात आले.
याप्रसंगी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता वसंतराव मुळीक व संशोधक इंद्रजित सावंत यांचे योगदान सर्वश्रुत आहे. कोरोना संसर्गामुळे मुळीक व त्यांच्या परिवारातील अनेक सदस्य बाधित असून ते स्वतः गेले १० दिवस उपचार घेत आहेत. कुटुंब चिंतातुर असताना व या आजारामुळे वसंतराव मुळीक आणि इंद्रजित सावंत हे उपस्थित नसल्याची संधी साधून एका बाजारबुणग्याने थेट दुकानदारीचा आरोप करून संपूर्ण समाजाचाच अवमान केल्याची भावना मराठा समाजात झालेली आहे. स्वत:च्या प्रसिद्धीची हाव असलेला व समाजात फूट पाडण्यासाठीच अशी पिलावळ सोडण्यात येत असल्याची उदाहरणे आहेत. त्यांतीलच हा एक महाभाग आहे, असे प्रसिद्धीपत्रकही दिले. या प्रसिद्धीपत्रकावर जिल्हा संघटक मिलिंद ढवळे-पाटील ,दीपक पाटील, तालुका संघटक जयसिंग शिंदे, अमोल निगवे, विजय शिंदे, प्रल्हाद पाटील ,मच्छिंद्र पाटील, गोगा बाणदार, प्रकाश तोडकर, नचिकेत पाटील, राम पाटील, विनोद पाटील, बाजीराव हवालदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.