शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

‘बीएएमएस’च्या वैद्यकीय अधिकाºयांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 7:18 PM

कोल्हापूर : नीती आयोगातील एम. सी. आय. एस. एम. २०१७ या प्रस्तावित विधेयकात योग्य ती दुरुस्ती करावी आणि बी.ए.एम.एस. डॉक्टरांचे अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टिसचे अधिकार कायम राहावेत,

कोल्हापूर : नीती आयोगातील एम. सी. आय. एस. एम. २०१७ या प्रस्तावित विधेयकात योग्य ती दुरुस्ती करावी आणि बी.ए.एम.एस. डॉक्टरांचे अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टिसचे अधिकार कायम राहावेत, या मागणीसाठी कोल्हापुरात शुक्रवारी वैद्यकीय अधिकाºयांनी मूक मोर्चा काढला. यावेळी वैद्यकीय अधिकारी काळ्या फिती लावून मोर्चात सहभागी झाले होते. या प्रस्तावित विधेयकाच्या निषेधार्थ अधिकाºयांनी वैद्यकीय सेवा एक दिवस बंद ठेवली होती.

केंद्र शासनाने नीती आयोग स्थापन केला आहे. त्यामध्ये एम.सी.आय.एस.एम. हे विधेयक प्रस्तावित आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर विद्यमान तरतुदीपैकी केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद कायदा १९७० आणि महाराष्ट्र वैद्यक व्यवसायिक अधिनियम १९६१ नुसार भारतीय चिकित्सा पद्धतीच्या बी. ए. एम. एस. डॉक्टरांच्या अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरण्याच्या कायदेशीर अधिकारावर गदा येण्याची भीती आहे. त्यामुळे नीती आयोगाच्या या विधेयकात दुरुस्ती करावी, या मागणीसाठी शुक्रवारी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) दसरा चौकातून मोर्चाचे आयोजन केले होते. संघटनेचे विभागीय सचिव डॉ. यशपाल हुलस्वार, ‘निमा’चे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, आदींच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकाºयांचा मोर्चास सुरुवात झाली. नागाळा पार्क येथून निघालेल्या या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे विसर्जन झाले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाºयांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले.

मोर्चात डॉ. अशोक वाली, डॉ. अरुण मोराळे, डॉ. हरीश नांगरे, डॉ. दिलखुष तांबोळी, डॉ. सचिन चौगुले, डॉ. शिवानंद पाटील, ‘निमा,’ करवीरचे अध्यक्ष डॉ. अभिजित मुळीक, सेक्रेटरी डॉ. आदित्य काशीद, खजानिस डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. हृषिकेश जाधव, डॉ. प्रदीप रावत, डॉ. प्रदीप चौगुले यांच्यासह जिल्'ातील बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकाºयांचा सहभाग होता.कोल्हापुरात शुक्रवारी बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकाºयांनी विविध मागण्यांसाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या मोर्चात असंख्य वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.वैद्यकीय अधिकाºयांच्या कोल्हापुरातील मूक मोर्चात महिला-युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.