शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

हद्दवाढीचा प्रस्ताव गेला मुंबईला

By admin | Published: June 24, 2014 1:17 AM

महापालिकेची तयारी पूर्ण : आता चेंडू शासनाच्या कोर्टात; लवकरच निघणार अधिसूचना

संतोष पाटील, कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आज, सोमवारी हद्दवाढीसंदर्भातील झालेल्या विशेष महासभेतील निर्णयांची माहिती व मंजूर ठराव तत्काळ राज्य शासनाला पाठविण्यात आला. ठरावाची प्रत हातोहात पोहोच करण्यासाठी नगररचना विभागातील अधिकारी रात्रीच मुंबईला रवाना झाले. आता लवकरच राज्य शासन महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार नगरविकास विभागामार्फत अधिसूचना काढून ३० बाधित गावांतील व्यक्तींकडून हरकती व सूचना मागविणार आहे. कोल्हापूर शहरात प्रस्तावित सर्व १७ गावांचा समावेश करण्यास नगरविकास संचालकांनी हिरवा कंदील दाखविला आहे. शहराची हद्दवाढ गरजेची असून, राज्य शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असा शेराही संचालकांनी अभिप्रायामध्ये दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने मागितलेल्या अभिप्रायातील सर्व मुद्दे महसूल गावांचा समावेश, महसूल देणी, संबंधित गावांत पायाभूत सुविधा पुरविणे, आदींना महानगरपालिकेच्या महासभेने मान्यता दिली. सभेने मान्यता दिलेल्या ठराव क्रमांक १४३ ची प्रत उद्या, मंगळवारी नगरविकास मुख्य सचिवांना सादर करण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करताना पुणे हद्दवाढीचा अभ्यास करून त्या धर्तीवरच प्रस्ताव तयार केला आहे. शासनाला यापूर्वीच २०११च्या जनगणनेप्रमाणे संबंधित गावांतील सर्व माहिती पुरविण्यात आली आहे. अशी असेल पुढील टप्प्यांतील प्रक्रियामहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (मुंबई, १९४९ चा ५९) चे कलम-३ पोटकलम (३) अन्वये प्रदान शक्तीचा वापर करून आणि उक्त कलम-३ चे पोटक लम (२) अंतर्गत निर्गमित शासन अधिसूचना नगरविकास, सार्वजनिक, आरोग्य आणि गृहनिर्माण विभाग क्र. एससीआर १२७१/४५३४५६-सी-१, १५ डिसेंबर १९७२ मध्ये नमूद कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये फेरबदल निश्चित करत आहे, अशा स्वरूपाची अधिसूचना राज्य शासनातर्फे लवकरच प्रसिद्ध केली जाईल. हद्दवाढीच्या निर्णयात बाधित होणाऱ्या सर्व गावे व व्यक्तींना याची माहिती व्हावी, यासाठी नगरविकास मंत्रालयातर्फे लवकरच अधिसूचना जाहीर करण्यात येईल. या अधिसूचनेद्वारे बाधित व्यक्तींच्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल. दिलेल्या तारखेपर्यंत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (२) विचार करून शासनास अभिप्राय देतील. हद्दवाढीचा पहिला टप्पा समजली जाणारी ही अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. प्रामाणिक मूल्यांक न कराकोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या प्रत्येक रस्त्याची पाहणी केली जावी. न केलेल्या कामासह केलेल्या कामाचा दर्जाही तपासला जावा. युटीलिटी शिफ्ंिटग, वृक्ष लागवड, कराराचा भंग, आदी मुद्द्यांवर रस्ते मूल्यांकन समितीबरोबर चर्चा करून प्रामाणिक मूल्यांकनाची अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, सोमवारी पत्रकारांना दिली.येथील शासकीय विश्रामगृहावर बिदरी यांनी रस्ते मूल्यांकन समितीच्या सदस्यांशी सुमारे तासभर चर्चा केली. बैठक खासगी स्वरूपाची असल्याने अधिकाऱ्यांव्यतिरिक्त माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केला होता. बिदरी म्हणाल्या, कराराप्रमाणे तब्बल २५ कोटींचे काम राहिल्याचे कंपनीने यापूर्वीच कबूल केले आहे. पावसाळी पाण्याचे नियोजन झालेले नाही. काँक्रिटचे रस्ते केल्याने पाण्याच्या पाईपलाईन रस्त्याखाली गेल्या आहेत. याचा देखभालीचा खर्च मोठा आहे. फुटपाथ अपूर्ण आहेत. रस्त्यांची उंची वाढल्याने शहराची प्लिंथ लेव्हल बिघडली आहे. सात हजार वृक्ष लागवड केलेली नाही, आदी सर्व त्रुटींबाबत समितीशी चर्चा केली. शहरातील प्रत्येक रस्त्याची पाहणी करून निष्पक्ष व निर्भीड, कोणाच्या दबावाखाली न येता समितीने अहवाल द्यावा, अशी मागणी यावेळी बिदरी यांनी केली आहे.‘आयआरबी’ने करारात नमूद नसतानाही काँक्रिटचे रस्ते करून देखभालीचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे पाण्याच्या पाईप रस्त्याखाली गेल्या. याचा संपूर्ण नकाशासह तपशील समितीसमोर सादर करण्यात आला. प्रत्यक्ष काम व करार, यातील तफावत पाहून सर्वसमावेशक अहवाल दिला जाईल, अशी आशा आयुक्त बिदरी यांनी व्यक्त केली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता मनीष पवार बैठकीसाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)